मिरज : फेसबुकवर मोटार विक्रीची जाहिरात देऊन वाहन देण्याच्या बहाण्याने बेळंकी (ता. मिरज) येथील दिलीप शंकर कोथळे यांची १ लाख २२ हजारांची रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दिलीप कोथळे यांनी प्रशांत यादव व सुभाष चंद (दोघे रा. औरंगाबाद) या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
फेसबुकद्वारे मोटार विक्रीची जाहिरात देणाऱ्या यादव व चंद या दोघांनी कोथळे यांना आर्मीमध्ये असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी कोथळे यांना वेळोवेळी फोन करून त्यांच्याकडून १ लाख २२ हजार ७५० रुपये घेऊनही त्यांना मोटार न देता फसवणूक केल्याचे कोथळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.