शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चारवेळची राष्ट्रीय पदक विजेती संजना बागडी राबतेय रोजंदारीवर ऊसाच्या शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST

संतोष भिसे / लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत चारवेळा पदके मिळवलेली सांगलीची महिला कुस्तीगीर संजना बागडी ...

संतोष भिसे / लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत चारवेळा पदके मिळवलेली सांगलीची महिला कुस्तीगीर संजना बागडी सध्या ऊसाच्या शेतात राबत आहे. मैदाने बंद झाल्याने आर्थिक कोंडी झाली, त्यामुळे कुस्तीच्या मॅटवरुन काळ्या रानात रोजंदारीवर तिला घाम गाळावा लागत आहे. कुस्तीपंढरी असणाऱ्या सांगली, कोल्हापूरच्या मातीचे दातृत्व कोठे हरवले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

महिला कुस्ती क्षेत्रात आघाडीची युवा कु्स्तीगीर म्हणून संजनाने नाव कमवले आहे. कतृर्त्वाने सिद्धही केले आहे. दिल्ली, पुणे, पाटणा, बेल्लारी येथील राष्ट्रीय स्पर्धांत पदके पटकावली आहेत. कोरोनाविरुद्धच्या मैदानात मात्र तिला सपशेल माघार घ्यावी लागली आहे. देशभरातील स्पर्धा रद्द झाल्या. गावोगावच्या यात्रा व मैदाने रद्द झाली, त्यामुळे आर्थिक स्रोत थांबला. स्पर्धेतील मानधन व बक्षिसातून आहाराचा, सरावाचा खर्च निघायचा. पण लॉकडाऊनमुळे जणू तिची कारकीर्दच ‘लॉक’ झाली आहे.

सांगलीजवळच्या तुंग (ता. मिरज) येथे संजना राहते. कृष्णा नदीत मासेमारी करुन वडील खंडू कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. बारावीत शिकणारी संजना कुस्तीच्या बक्षिसांमधून स्वत:चा खर्च चालवते, वडिलांवर भार टाकत नाही. सध्या लॉकडाऊनमुळे मात्र पर्याय राहिला नाही. राष्ट्रीय खेळाडूचा सराव आणि आहाराचा महिन्याचा खर्च ५० ते ७० हजारांच्या घरात जातो. संजनाला मात्र मुरड घालून पाच-सात हजारांतच भागवावा लागत आहे. सध्या कृष्णेची पातळी वाढल्याने वडिलांची मासेमारी थांबली आहे, पण संजनाचा खर्च तर थांबणारा नाही, त्यामुळे ती शेतात रोजंदारीवर राबायला जात आहे. ऊसासाठी सरी सोडणे, वाफे तयार करणे, पाण्यासाठी दारे तयार करणे अशी कामे करत आहे. सहा ते आठ तासांच्या कामासाठी ३०० रुपयांपर्यंत मजुरी मिळते, त्यातून स्वत:चा आणि काही प्रमाणात घरचाही खर्च निघतो.

मैदाने बंद असली तरी संजनाने सराव थांबवलेला नाही. सकाळी घरात दोरीवरचे व्यायाम, पोहणे आदीच्या माध्यमातून ती तंदुरुस्ती राखते. संध्याकाळी कवलापूरला उत्तमराव पाटील यांच्या कुस्ती केंद्रात वडील घेऊन जातात.

चौकट

सांगलीकरांनो, कोठे गेले तुमचे दातृत्व?

संजनासारख्या प्रतिभावंत राष्ट्रीय कुस्तीगिराला खर्चासाठी शेतात रोजंदारीवर राबण्याची वेळ आल्याने सांगलीकरांच्या दातृत्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. कुस्तीला लोकाश्रय देण्याच्या गप्पा मारणाऱ्या साखर कारखानदारांची भाषाही पोकळच असल्याचे सिद्ध होत आहे. चारवेळा राष्ट्रीय पदके मिळवल्यानंतर तिने आणखी कशी गुणवत्ता सिद्ध करायला हवी, असाही प्रश्न आहे.

कोट

मैदाने बंद असल्याने सराव आणि उत्पन्न दोन्ही थांबले आहे. खर्च चालविण्यासाठी शेतात घाम गाळण्याशिवाय पर्याय नव्हता. या कामाच्या निमित्ताने शारीरिक मेहनतही होते.

- संजना बागडी, युवा महिला कुस्तीगीर