शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार बेशिस्त वाहनचालक जाळ्यात

By admin | Updated: April 25, 2017 23:25 IST

दुसऱ्यादिवशीही दणका : जिल्ह्यात नाकेबंदी; आठ लाखांचा दंड वसूल

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात दुसऱ्यादिवशीही पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना कारवाईचा दणका दिला. जिल्ह्यात ७० ‘पार्इंट’वर केलेल्या नाकेबंदीच्या जाळ्यात ४ हजार ४२ वाहने सापडली. त्यांच्याकडून सुमारे सात लाख ८० हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी परिक्षेत्रात नाकेबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे व महामार्गावर, तसेच ग्रामीण भागातील मार्गावरील विविध चौक, पूल, बायपास रस्ते, महत्त्वाचे जंक्शन या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून नाकेबंदी केली जात आहे. सोमवारी व मंगळवारी सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ या वेळेत नाकेबंदी लावण्यात आली होती. सोमवारी सकाळच्या सत्रात १ हजार ६८५ वाहनधारकांवर कारवाई करुन तीन लाख ७० हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला होता. मंगळवारी सकाळी ४ हजार ४२ वाहनधारकांना पकडून सात लाख ८० हजाराचा दंड वसूल केला. (प्रतिनिधी)कारवाईच्या केसेसची संख्यासेफ्टी बेल्ट : ९७६ केसेसवाहन चालविताना मोबाईलवर बोलणे : ११९वाहनास टिन्टेड ग्लास वापरणे : ५४रिव्हर्स हॉर्नचा वापर करणे : ८हॉकिंग हॉर्न : २ट्रीपल सीट : २८३लेन कटिंग : ७७सिग्नल जंपिंग : ३४ दारूच्या नशेत वाहन चालविणे : ६फॅन्सी नंबर प्लेट : ५६विनापरवाना वाहन चालविणे : ५२१बेकायदा प्रवासी वाहतूक : २५एकूण : ४,०४२ एकूण दंड : ७ लाख ८० हजार रुपये पाचशेहून पोलिसजिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्यासह ६ पोलिस उपअधीक्षक, ५ पोलिस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलिस निरीक्षक, २२ उपनिरीक्षक, तसेच ४५२ पोलिस शिपाई नाकेबंदीच्या कारवाईत सहभागी झाले होते. यावेळी दारुच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांची यंत्राद्वारे तपासणी करुन कारवाई करण्यात आली. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात ७० पार्इंटवर नाकेबंदी सुरु होती. रात्री साडेआठपर्यंत ही कारवाई सुरु होती.