शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून युवकाच्या खूनप्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST

शिराळा : प्रेमप्रकरणातून मारहाण केलेल्या सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज विनायक घाटगे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी भाऊसाहेब बाजीराव दळवी, ...

शिराळा : प्रेमप्रकरणातून मारहाण केलेल्या सातवे (ता. पन्हाळा) येथील शिवतेज विनायक घाटगे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी भाऊसाहेब बाजीराव दळवी, पतंग विकासराव दळवी, सौरभ भाऊसाहेब दळवी, अजय विजय दळवी या चौघांना शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायाधीश एच. एस. सातपुते यांनी न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला आहे. याबाबत दीपक यशवंत हांडे (वय ४८, रा. सातवे, ता. पन्हाळा) यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली होती. ही घटना बुधवार, दि. ८ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली होती.

दीपक हांडे हे त्यांची फकिरवाडी येथे विकलेली म्हैस सोडण्यासाठी शिवतेजसोबत त्याच्या चुलत्यांचा टेम्पो घेऊन जात होते. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी मुलगी पळवून नेल्याचा राग मनात धरून मांगले-कांदे रस्त्यावर सावर्डे फाटा येथे भाऊसाहेब दळवी, पतंग दळवी, सौरभ दळवी, अजय दळवी यांनी शिवतेजला मारहाण केली. त्यास मोटरसायकलवरून अन्यत्र नेऊन विवस्र करीत जबर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला.

कोडोली पोलिसांनी त्याला प्रथम उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी त्याची प्रकृती चांगली होती. मध्यरात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. पुढील उपचारासाठी त्याला काेल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वरील चाैघांना अटक करण्यात आली हाेती. शुक्रवारी शिराळा न्यायालयाने त्यांची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली.