शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:17 IST

इस्लामपूर : शहरातील मंत्री कॉलनी परिसरातील बारावर्षीय शाळकरी मुलीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांत बुधवारी चौघांविरुध्द, तिला आत्महत्येस प्रवृत्त ...

इस्लामपूर : शहरातील मंत्री कॉलनी परिसरातील बारावर्षीय शाळकरी मुलीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांत बुधवारी चौघांविरुध्द, तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत, पतीसह त्याची रखेल आणि सासू-सासऱ्याविरुध्द आरोप केले आहेत.यातील स्वप्नाली ऊर्फ माधुरी सुरेश हेगाणा हिला पोलिसांनी अटक केली. आहे. अश्विनी कृष्णात कोरे (वय ३0, मूळ रा. आष्टा नाका, इस्लामपूर, सध्या तळसंदे, ता. पन्हाळा) यांनी फिर्याद दिली आहे.अंजली कृष्णात कोरे असे मृत मुलीचे नाव आहे. कृष्णात सदाशिव कोरे, सदाशिव बंडू कोरे, शशिकला सदाशिव कोरे यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.अश्विनी कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत, पती कृष्णात याने आठ वर्षांपूर्वी स्वप्नाली ऊर्फ माधुरी सुरेश हेगाणा हिच्याशी संसार थाटला होता. तो तिच्यासह मंत्री कॉलनी परिसरात वेगळा राहत होता. अधुनमधून आष्टा नाका येथे घरी येऊन आपल्याशी भांडण, वादविवाद करुन, मुलांना जबरदस्तीने त्याच्याकडे राहण्यास घेऊन जात होता. त्यावेळी स्वप्नाली ही अंजलीला त्रास देऊन तिच्याकडून जबरदस्तीने घरातील धुणी-भांडी, तसेच साफसफाई करवून घेत होती. आष्टा नाका येथील घरात सासू व सासरेदेखील तिला त्रास देत होते.१५ दिवसांपूर्वी कृष्णात कोरे याने आपल्याशी भांडण काढून मारहाण करुन, ट्रक घेण्यासाठी आई-वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून घरातून बाहेर काढले. त्यावेळी सासू-सासºयानेही, पैसे घेऊन ये, नाही तर ठार मारू, अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीच्या मृत्यूस हे चौघेच जबाबदार असून, माहेरहून पैसे आणण्याकरिता आपलाही शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे अधिक तपास करत आहेत.अंत्यदर्शन घेण्यास आईला विरोधज्या वयात खेळायचे, बागडायचे, त्या न कळत्या वयात अंजलीला कौटुंबिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यातून आपले जीवन संपवावे, अशी तिच्या बाळबोध मनाची झालेली भावना आणि त्याच त्वेषातून तिची संपलेली जीवनयात्रा अंगावर शहारे आणणारी आहे. त्यावर कळस म्हणजे अंजलीचा मृतदेह घरी आणल्यानंतर तिच्या आईला तिचे अंत्यदर्शन घेण्यास झालेला विरोध, हाही तितकाच संतापजनक ठरला.