शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार नगरपंचायती, एक नगरपालिका

By admin | Updated: March 18, 2016 00:15 IST

अधिसूचना जारी : कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, शिराळा नगरपंचायती, पलूस पालिका

सांगली : गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायत अथवा नगरपरिषद स्थापन करण्याच्या शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जिल्ह्यात कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर व शिराळा याठिकाणी नगरपंचायती, तर पलूस येथे नगरपरिषद स्थापन करण्याची अधिसूचना गुरुवारी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आदेशामुळे या पाच ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची माहिती तातडीने मुख्य कार्यालयास देण्यात येणार असल्याने गुरुवारी दुपारनंतर त्याची लगबग जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून येत होती. सायंकाळी उशिरापर्यंत माहिती संकलनाचे काम सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी नगरपंचायती अथवा नगरपरिषदा स्थापन करण्याबाबत शासकीय स्तरावरून हालचाली सुरू होत्या. याबाबत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. आता जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर, शिराळा येथे नगरपंचायत अस्तित्वात येणार आहे, तर पलूस येथे नगरपरिषद स्थापन होणार आहे. या तालुक्यांच्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या आधारावर पंचायती स्थापन होणार आहेत. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता शासनस्तरावरून या पाच शहरांची लोकसंख्या, प्रभाग रचना, हद्द निश्चित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यात अगोदरच पाच ठिकाणी नगरपालिका अस्तित्वात असून, आता या नवीन निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील यापूर्वीच्या जत वगळता चार नगरपालिकांच्या निवडणुका वर्षभरात होणार आहेत. त्यांच्यासोबत आता या नवीन चार नगरपंचायती व एका नगरपरिषदेसाठीही एकाचवेळी निवडणुका होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)