शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पेठ-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण ठप्प

By admin | Updated: January 14, 2015 00:29 IST

वाहतुकीची कोंडी : छोटे-मोठे अपघात बनले नित्याचे

सुरेंद्र शिराळकर - आष्टा - पेठ-सांगली रस्त्यावरील प्रमुख गाव म्हणजे आष्टा. पेठ-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आष्टा येथे आष्टा लायनर्स, पोलीस ठाणे, एसटी स्टँड चौक, दुधगाव रस्ता ते डांगे कॉलेज स्टॉपपर्यंत व तुंग ते सांगलीवाडीपर्यंत रस्त्याचे काम सुरु आहे. आष्टा परिसरातील रस्त्याचे चौपदरीकरण न झाल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. ऊस वाहतुकीमुळे आधीच व्यस्त असलेल्या या रस्त्याला जत्रेचे स्वरुप येत आहे. वाहतुकीची कोंडी व छोटे-मोठे अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. संथ गतीने सुरु असलेले चौपदरीकरणाचे काम पूर्ण कधी होणार? याच्या प्रतीक्षेत प्रवासी आहेत.आष्टा हे माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील मोठे व माजी आमदार विलासराव शिंदे यांचे गाव. आष्टा शहरात अनेक विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. शहरात अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, डांगे आयुर्वेद, वैद्यकीय महाविद्यालय, डी. एड्., बी. एड्., एम. एड्., नर्सिंग, आय. टी. आय. यासह आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, के. बी. पी. इंग्लिश मिडीअम स्कूल, कन्या विद्यालय, १६ प्राथमिक शाळा, शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था, सह. सोसायट्या कार्यरत आहेत.सांगली-इस्लामपूर, कोल्हापूर-तासगाव या गावांना जोडणारे आष्टा हे प्रमुख शहर असल्याने अनेक नोकरदार आष्टा येथे वास्तव्यास आहेत. आष्टा ते सांगली, इस्लामपूर ते कोल्हापूर, तासगाव या परिसरातून अनेक विद्यार्थी व नोकरदार आष्ट्याहून नियमित प्रवास करीत असतात. आष्टा बसस्थानकावर प्रचंड गर्दी होत असते. सांगली इस्लामपूर रस्त्यावर तर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यात चौपदरीकणाचे काम सुरु झाल्यापासून, येथून प्रवास करताना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागतो.आष्टा शहरापासून ३ ते ५ कि.मी. परिसरात वाहनांची गर्दी असते. जुना शिंदे मळा, आष्टा लायनर्स, कन्या विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, के. बी. पी. इंग्लिश मिडीयम स्कूल, बसस्थानक ते आष्टा नाका, थोटे डेअरी, डांगे स्टॉप, लोकमान्य शाळा ते मिरजवाडी या मार्गावर चारचाकी, दुचाकी वाहने भरधाव वेगात येतात. ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. एकूणच पेठ- सांगली रस्त्याच्या या कामामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हे काम पूर्ण करावे अन्यथा रोषाला बळी पडावे लागेल, असा इशारा नागरिकांतून होत आहे.आष्ट्यात अपघाताचा सापळाआष्टा बसस्थानकासमोर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात सांगली-इस्लामपूर रस्त्याच्या पूर्व व पश्चिम बाजूस पेठवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर व लोकनेते राजारामबापू पुतळ्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून वाळूची पोती भरुन ठेवली आहेत. मात्र या चौकात जागा अपुरी असल्याने संबंधितांनी दुभाजक लहान करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.