शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

बुलडाणा जिल्ह्यात विविध अपघातात चार ठार

By admin | Updated: July 21, 2016 23:47 IST

दोन महिला व दुचाकीस्वाराचा समावेश; देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगाव व शेगाव येथील घटना.

दत्ता पाटील --तासगावनगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उमेदवारी निश्चित नसली तरी, इच्छुकांकडून प्रभागात चाचपणीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. प्रभागांची पुनर्रचना होऊन आरक्षणानंतर बहुतांश विद्यमान नगरसेवकांचे आरक्षण सोयीचे झाले आहे. त्यामुळे विद्यमान कारभाऱ्यांचा उमेदवारीसाठी अट्टाहास असल्याचे दिसून येत आहे. तसेच दुसरीकडे काही नवीन चेहऱ्यांनाही उमेदवारीचा हव्यास असून त्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना नेत्यांची कसरत होणार आहे.तासगाव नगरपालिकेत यावेळी नगरसेवकांची संख्या एकवीस झाली आहे. प्रभागांची पुनर्रचना होऊन आरक्षणातही फेरबदल झाले आहेत. निवडणुकीसाठी अजून अवधी आहे. मात्र आरक्षण जाहीर झाल्यापासून संबंधित इच्छुकांनी आतापासूनच प्रभागावर लक्ष केंद्रित केले आहे. जनतेच्या समस्यांपासून ते व्होट बँक असणाऱ्या समाजापर्यंत सर्वत्र चाचपणीस सुरुवात केली आहे. विद्यमान नगराध्यक्ष अविनाश पाटील, नगरसेवक बाबासाहेब पाटील, जाफर मुजावर, सुशिला साळुंखे, सारिका कांबळे, शिल्पा धोत्रे, विजया जामदार, शुभांगी साळुंखे यांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे. आरक्षणानंतर बहुतांश विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा आहे, तर नगरसेवक अमोल शिंंदे, शरद मानकर, अजय पवार, अनिल कुत्ते यांच्यापैकी काहींच्या प्रभागात आरक्षणाने पत्ता कट झाला आहे. काहींचे प्रभाग पुनर्रचनेमुळे विभागले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सोयीच्या प्रभागाची चाचपणी सुरु आहे. काही ठिकाणी एकाच गटाच्या (विशेषत: भाजपच्या) विद्यमान दोन नगरसेवकांकडून एकाच प्रभागावर डोळा ठेवून मोर्चेबांधणीस सुरुवात आहे. त्यामुळे उमेदवारीवरून रणधुमाळी होणार असल्याचे चित्र आहे. आरक्षणात बदल झाल्याने नगरसेवकांच्या नातेवाईकांनीही फिल्डिंग लावली आहे. त्यामध्ये विद्यमान नगरसेविका अनुराधा पाटील यांचे दीर सचिन पाटील, नगरसेविका सुशिला साळुंखे यांचा मुलगा अरुण साळुंखे यांची नावे चर्चेत आहेत.यावेळचे निवडणुकीचे चित्र पाहिल्यानंतर, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या विद्यमान नगरसेवकांचा भरणा मोठा आहे, तर काही जुने आणि नवे चेहरेही रिंगणात येण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी जोरदार मोर्र्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी देताना सर्वच पक्षाच्या, विशेषत: भाजपमध्ये इच्छुकांचा मोठा भरणा असल्याने नेत्यांना उमेदवारी निश्चित करताना कसरत करावी लागणार आहे, हे नक्की...विकास कामांचा नगरसेवकांना धसकाअपवाद वगळता अनेक विद्यमान नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामांबाबतीत नागरिकांची ओरड आहे. अनेक ठिकाणी कामे प्रलंबित आहेत. आता निवडणूक तोंडावर आल्याने नागरिकांकडून कामांच्याबाबतीत जाब विचारला जाणार, याची नगरसेवकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रभागातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा सुरू केला आहे. त्याअनुषंगाने बुधवारी नगरपालिकेत नगरसेवकांची बैठकही झाल्याची चर्चा आहे.