शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणाचे चारही दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:10 IST

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

वारणावती (सांगली) : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली असून मंगळवारी दुपारी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५० मीटरने खुले केले आहेत. दरवाजातून ६००० क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून १६०० क्युसेक असा ७६०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू झाला आहे. त्यामुळेनदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण हे ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे मातीचे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाºया या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने रिपरिप सुरू केली. पण सोमवारपासून पावसाने जोर वाढविला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातून येणाºया पाण्याची आवक वाढली आहे.

गेल्या २४ तासात ४५ मिलिमीटर पावसासह एकूण १८४२ मिलिमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने जोर वाढवला होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने मंगळवारी सकाळी दहा वाजता धरणाचे दोन वक्राकार दरवाजे खुले केले. मात्र दुपारपर्यंत पाणी वाढल्याने दुपारी अडीच वाजता चारही वक्राकार दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला.

धरण सोमवारी दुपारी चार वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाची पाणी पातळी नियंत्रणासाठी पाणी बाहेर सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण वाढले, तर विसर्ग वाढविला जाणार आहे. त्यामुळे वारणा नदीच्या काठावरील लोकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.गतवर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे ५ आॅगस्टला खुले केले होते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरणे आवश्यक होते. प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ दिवस उशिराने धरणाच्या वक्राकार दरवाजातून पाणी बाहेर सोडले जात आहे.

२०१५ चा अपवाद वगळता दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे वारणा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शिराळा, वाळवा, शाहुवाडी, पन्हाळा, कºहाड या तालुक्यांतील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याबाबत कधीही तुटवडा जाणवलेला नाही.