शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आखाती देशांत द्राक्षाचे चार कंटेनर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:14 IST

सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे ...

सांगली : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात मिरजेतील खासगी निर्यातदार कंपनीकडून चार कंटेनरमधून ६० टन द्राक्षे आखातात रवाना झाली. १० जानेवारीपासून निर्यात वेग घेईल. दरम्यान, निर्यातीदरम्यानच्या ७ टक्के कटला पद्धतीविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

गेल्यावर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट केली. यंदा मात्र तशी स्थिती नाही. लांबलेल्या पावसाने छाटण्या खोळंबून सुमारे २० टक्के बागा वाया गेल्या. त्यामुळे द्राक्षे मुबलक नाहीत. कोरोनावर आरोग्यदायी म्हणून मागणीही चांगली आहे. साहजिकच चांगला दर मिळत आहे.

चौकट

पहिल्याच टप्प्यात दणकेबाज दर

सध्या सुपर सोनाकाला चार किलोच्या पेटीला ३५० ते ४१० रुपये दर मिळत आहे. आरके ३७० ते ४२०, अनुष्का ४०० ते ४२०, मिडीयम सुपर ३२० ते ३५० असा दणदणीत दर आहे. शरदला चक्क ५५० ते ६०० रुपये दर मिळत आहे.

चौकट

कटल्याविरोधात बागायतदार आक्रमक

निर्यातीच्या द्राक्षांमध्ये ७ टक्के कटला घेतला जातो. म्हणजे एकूण द्राक्षांपैकी ७ टक्के खराब म्हणून काढली जातात. घट-तुटीच्या नावाखाली कमी पैसे दिले जातात. याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. निर्यातीच्या बागा व्यापाऱ्याकडे उतरणीसाठी देण्यापूर्वी शेतकरी स्वत:च खराब माल बाजूला काढतात, तरीही प्रत्यक्ष हार्वेस्टिंगवेळी पुन्हा ७ टक्के कटला घेतात. अशा व्यापाऱ्यांना हार्वेस्टिंग करु देणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. हार्वेस्टिंग करणारी टोळी प्रत्येक गाडीमागे ५०० ते २००० रुपयांची खुशाली घेते. अशा कंपन्या अथवा व्यापाऱ्यांना माल देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोट

सात टक्के कटल्यामुळे निर्यातीच्या द्राक्षांना स्थानिक बाजारपेठेचाच दर मिळतो. बागेसाठी लाखो रुपये खर्चानंतरही भुर्दंड सोसावा लागतो.

- नागेश कुंभार, बागायतदार, सावळज

कोट

घट, तूट आणि चांगल्या मालाच्या नावाखाली कटला घेतला जातो. यामुळे शेतकऱ्यांची थेट लूट होते. निर्यातीसाठी जिवापाड जपलेल्या बागेतील मालाची नासाडी होते.

- अनिल माळी, बागायतदार, सावळज