शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिद्द व आवडीच्या जोरावर जगवली चाळीस झाडे

By admin | Updated: May 7, 2017 23:50 IST

जिद्द व आवडीच्या जोरावर जगवली चाळीस झाडे

पांडुरंग भिलारे । लोकमत न्यूज नेटवर्कवाई : सहा वर्षांपूर्वी परखंदी हायस्कूल हे गावाच्या चावडीवर मंदिरात व परिसरातील खोल्यांमध्ये भरायचे, त्या परिसरात वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध नव्हती़ त्या कालखंडात विद्यार्थ्यांना दरवर्षी वृक्ष दत्तक स्वरुपात घरी लावण्यास देत असे व त्यांचे संवर्धन विद्यार्थ्यांमार्फत करून घेत असे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला़ आत्तापर्यंत विद्यार्थ्यांच्या घराच्या व शेतीच्या परिसरात शेकडो झाडे डौलात जिवंत आहेत़ यानतंर संस्था व्यवस्थापनाने विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी गावालगत मंदिर परिसरात प्रशस्त जागा उपलब्ध करून दिल्याने खऱ्या अर्थाने वृक्षारोपणासाठी प्रशस्त जागा उपलब्ध झाली़ नवीन जागेत विद्यालयाची आकर्षक इमारत उभी राहिली़ मग शाळेच्या परिसरात आम्ही वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आणि मग नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्यास सुरुवात झाली. गेल्या सहा वर्षांपासून आम्ही विद्यार्थ्यांना दत्तक स्वरुपात वृक्षवाटप बरोबरच विद्यालयाच्या परिसरात आंबा, चिक्कू, वड, गुलमोहोर, नारळ, बदाम, सीताफळ, आवळा, लिंब आदी प्रकारची चाळीस झाडे लावली आहेत़ वृक्षदत्तक व परिसरात लावण्यासाठी वाई येथील सुयश प्रतिष्ठाननेही अनेकदा झाडे उपलब्ध करून दिल्याने मोलाचे सहकार्य लाभले़ झाडांच्या रोपणाबरोबरच संवर्धनाला आम्ही खूप महत्त्व देतो़ यासाठी आम्ही बहुतांश झाडांना लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत़ झाडांना शेणखताचा डोसही पावसाळा सुरू होण्यापूर्वी दिला जातो़ त्यांना ठिबक केले आहे़ विद्यालय परिसरातील झाडे विद्यार्थ्यांना दत्तक स्वरुपात दिली आहेत़ त्यांना पाणी घालण्याचे व संरक्षणाची जबाबदारी दिली आहे.ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून सर्व झाडांना ठिबकची सोयही करण्यात आली आहे़ तसेच विद्यार्थ्यांना शेतीतील ज्ञान मिळावे म्हणून शाळेच्या परिसरात कांदा, लसूण, वांगी आदी पिकांचे वाफे केले आहेत़ याची ही देखभाल विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते़ वृक्षसंवर्धनसाठी विद्यालयाचे शिक्षक पोपट जाधव, विजय भोईटे, शरद गायकवाड, प्रतिभा भांडवलकर, उमेश शिंदे, सेवक महेश महांगडे, रेखा गायकवाड आदी परिश्रम घेतात.