शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊंच्या खच्चीकरणाचा सूत्रबद्ध खेळ अजूनही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

विश्वास पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासपूर्ण संशोधनानंतर ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ हा ग्रंथ नुकताच लिहून पूर्ण केला. हा ...

विश्वास पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासपूर्ण संशोधनानंतर ‘अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान’ हा ग्रंथ नुकताच लिहून पूर्ण केला. हा ग्रंथ प्रकाशनासाठी पुणे येथे राजहंस प्रकाशनकडे सुपुर्द करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, लेखक सोपान खुडे, प्रभाकर ओव्हाळ, डॉ. संतोष खेडलेकर आदी उपस्थित होते.

हे पुस्तक म्हणजे अण्णा भाऊंचे वाङ्मयीन चरित्र आहे. यात अण्णा भाऊंचा जीवनपट मांडण्याबरोबरच त्यांच्या साहित्यकृतींचे वेगळेपण अधोरेखित केले आहे. अण्णा भाऊंचे हयात असलेले अनेक नातेवाईक, त्यांचा सहवास लाभलेले स्नेही अशा अनेकांशी बोलून हे पुस्तक साकारले आहे, असेही विश्वास पाटील यांनी सांगितले.

दिलीप माजगावकर म्हणाले की, अण्णा भाऊंसारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वावर मोठ्या साहित्यिकाकडून जर लेखन झाले, तर मराठी वाचकांपर्यंत अण्णा भाऊ खऱ्या अर्थाने पोहोचू शकतील. याच भूमिकेतून आम्ही हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत. अगदी लवकरच हे पुस्तक वाचकांच्या हातात येईल, यादृष्टीने नियोजन केले आहे.