शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

माजी सभापतींना मोबाईलचा मोह सुटेना!

By admin | Updated: April 26, 2016 00:47 IST

नूतन पदाधिकाऱ्यांचा तगादा : महापालिका प्रशासनाची कोंडी

सांगली : महापालिका प्रभाग समितीच्या माजी सभापतींनी अद्यापही मोबाईलचे सीमकार्ड जमा केलेले नाही. सभापती पदावरून पायउतार होऊन आठवडा लोटला तरी, मोबाईलचे सीमकार्ड या माजी सभापतींकडेच आहे. नूतन सभापतींनी सीमकार्डसाठी प्रशासन अधिकाऱ्यांकडे तगादा लावला आहे. मात्र माजी सभापतीच दाद देत नसल्याने प्रशासनाचीही अडचण झाली आहे. प्रभाग सभापतींना महापालिकेकडून मोबाईल, वाहन भत्ता आदि सुविधा दिल्या जातात. मोबाईलचे बिल महापालिकाच भरते. नव्या सभापतींची निवड झाल्यानंतर सीमकार्ड प्रशासनाकडे जमा करण्याची पद्धत आहे. त्यानंतर सभापती पदावर निवड होणाऱ्या नव्या सदस्याला सीमकार्ड दिले जाते. चारही प्रभाग सभापतींचे मोबाईल नंबर नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग समितीत कोणतीही समस्या उद्भवल्यास नागरिक या मोबाईल नंबरवर संपर्क साधून अडचणी सांगत असतात. गेल्या आठवड्यात प्रभाग समिती सभापती पदांच्या निवडी झाल्या. त्यानंतर माजी सभापतींनी मोबाईल सीमकार्ड प्रशासनाकडे जमा करणे क्रमप्राप्त होते. पण आठवडा लोटला तरी, काही माजी सभापतींनी त्यांचे सीमकार्ड जमा केलेले नाही. एका सभापतीचे सीमकार्ड तर दिराकडेच आहे. खुद्द माजी सभापतींनी मोबाईलचा किती वापर केला असेल, हा संशोधनाचा विषय आहे. नूतन सभापतींनी मोबाईल सीमकार्ड देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. पण अजून सीमकार्ड जमाच झाली नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. माजी सभापतींकडून दोन ते तीन दिवसात सीमकार्ड जमा केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या कालावधित सीमकार्डचा गैरवापर झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर? असा सवालही नूतन पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)