शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार संपतराव चव्हाण यांचे निधन

By admin | Updated: July 4, 2015 00:01 IST

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते : नागराळेत उद्या अंत्यसंस्कार

दुधोंडी : सांगली जिल्ह्यातील तत्कालीन भिलवडी-वांगी (सध्याचा पलूस-कडेगाव) मतदारसंघाचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव अण्णासाहेब चव्हाण (वय ७६) यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे मूळ गाव नागराळे (ता. पलूस) आहे. १९७८ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघात चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. कम्युनिस्ट पक्षाचे जी. डी. बापू लाड यांचा पराभव करीत या मतदारसंघाचे ते पहिले आमदार झाले. त्यानंतर १९८० मध्ये चव्हाण यांनी काँग्रेसचे बंडखोर डॉ. पतंगराव कदम यांच्याशी संघर्ष करीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला. अत्यंत धडाडीचे व अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख होती. तत्कालीन तासगाव तालुक्यातील सहकारी, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. १९८५ मध्ये डॉ. पतंगराव कदम यांच्याकडून पराभव झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त झाले. तरीही सामाजिक व पक्षकार्यात ते नेहमीच हिरीरीने भाग घेत. चव्हाण यांचे वडील अण्णासाहेब व काका विष्णू हे दोघेही पैलवान होते. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जिल्हा परिषदेतून झाली. १९७२ मध्ये ते कुंडल जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. पृथ्वीराज व संग्राम व मुलगी सुषमा असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव सांगलीतील भारती विद्यापीठात दर्शनासाठी ठेवले आहे. त्यांच्यावर रविवारी (दि. ५) नागराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)