शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावच्या माजी आमदाराला ७० व्या वर्षी झाली पुत्रप्राप्ती; सांगली महापालिकेकडून दाखला : सुनेची पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:27 IST

सांगली : मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सुनेला मालमत्तेतील हिस्सा मिळू नये, यासाठी बेळगाव येथील ७० वर्षीय माजी आमदाराने २०१६ मध्ये ...

सांगली : मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सुनेला मालमत्तेतील हिस्सा मिळू नये, यासाठी बेळगाव येथील ७० वर्षीय माजी आमदाराने २०१६ मध्ये पुत्रप्राप्ती झाल्याचा दावा केला आहे. सांगलीच्या महापालिकेने मूल झाल्याचा जन्मदाखलाही त्यांना दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी तक्रार माजी आमदाराच्या सुनेने रविवारी सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.माजी आमदाराच्या मुलाचे आठ वर्षांपूर्वी पंढरपुरातील एका राजकीय घराण्यातील तरुणीशी लग्न झाले होते. दोन वर्षे संसार केल्यानंतर सून माहेरी पंढरपूरला गेली. ती तिथेच राहू लागली. दरम्यानच्या काळात तिच्या पतीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. पंढरपूर येथे माहेरी राहत असलेल्या सुनेला मालमत्तेचा हक्क द्यावा लागणार होता. यासाठी माजी आमदार असलेल्या सासऱ्याने ७० व्या वर्षी अपत्यप्राप्ती झाल्याची नोंद घातली आहे. २०१६ मध्ये सांगलीत एका नर्सिंग होममध्ये त्यांची पत्नी प्रसूत झाली. महापालिकेने तसा जन्मदाखलाही दिला असल्याचे सुनेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, असेही तिने म्हटले आहे.चौकशी सुरू : प्रशांत पाटीलसहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील म्हणाले, बेळगावचा एक माजी आमदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध पंढरपुरात राहणाºया या सुनेने तक्रार केली आहे. त्यांच्या सासºयाने त्यांना अपत्यप्राप्ती झाल्याची खोटी नोंद घातल्याचे सुनेचे म्हणणे आहे. त्यांनी जी काही कागदपत्रे दिली आहेत, त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.