शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

माजी संचालकांची ‘हिट विकेट’

By admin | Updated: April 6, 2015 01:21 IST

जिल्हा बँक घोटाळा : सहकार विभागाच्या चौकशी शुल्क कारवाईने खळबळ

अविनाश कोळी ल्ल सांगली नामांकित क्रिकेटपटूने स्वत:च्या बेल्स स्वत: उडवून हिट विकेट होण्यासारखा प्रकार जिल्हा बॅँकेतील माजी संचालकांच्याबाबतीत झाला. स्वत:च्याच नियमबाह्य कारभाराचा फटका त्यांना बसला. तब्बल ४० माजी संचालक एकाचवेळी बाद झाले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करून मैदानात उतरताच सहकार विभागाच्या कारवाईने शून्यावर बाद व्हावे लागल्याने या माजी संचालकांना धक्का बसला आहे. जिल्हा बॅँकेतील २००१-२००२ ते २०११-१२ या कालावधित झालेल्या ४ कोटी १८ लाखांच्या गैरव्यवहाराचे भूत आता या माजी संचालकांच्या मानगुटीवर बसले आहे. निवडणूक लढवून पुन्हा बॅँकेच्या कारभारात सन्मानाने परत येण्याची स्वप्ने रंगविली जात असतानाच, या माजी संचालकांना नव्या सहकार अस्त्राने घायाळ केले. जखमी अवस्थेत त्यांना आता मैदानातून बाहेर व्हावे लागले आहे. नियमबाह्य कारभाराचा फटका त्यांना बसला आहे. लवकरच गैरव्यवहाराच्या रकमेचीही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे चौकशी शुल्काचा केवळ ट्रेलर होता. अजून ‘पिक्चर बाकी’ आहे, असाच संदेश या कारवाईतून मिळाला आहे. याविरोधात न्यायालयीन लढाईसुद्धा या माजी संचालकांमार्फत दिली जात आहे. प्रत्येकाच्या डोईवर आलेली जबाबदारी केवळ ४२६ रुपयांची आहे. रक्कम किरकोळ असली तरी, या रकमेचा झटका मोठा आहे. हेच ४२६ रुपये त्यांना सहकाराच्या मैदानातून कायमचे बाजूला करणारे ठरू शकतात. म्हणूनच या चौकशी शुल्काचा झटका अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. सहकार विभागाच्या आक्रमक धोरणांमुळे सध्या माजी संचालक बॅक फूटवर असतानाच सहकार विभागाच्या थोड्याशा ‘हुशारी’ने ४० माजी संचालक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या मैदानातून बाद झाले. अर्थात पक्षीय पातळीवरही वादग्रस्त माजी संचालकांना पुन्हा बॅँकेत प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत विचारमंथन सुरू आहे. हे मंथन सुरू असतानाच सहकार विभागानेच झटका दिल्याने माजी संचालकांसमोरील आणि पक्षीय नेत्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.