शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे डोंगर परिसरातील वनसंपदा धोक्‍यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST

फोटो ओळ : आगीत जळून खाक झालेला चिंचणी-तडसर परिसरातील डोंगर. प्रताप महाडिक कडेगाव : तालुक्यातील तडसर-चिंचणी सरहद्दीवरील डोंगर ...

फोटो ओळ : आगीत जळून खाक झालेला चिंचणी-तडसर परिसरातील डोंगर.

प्रताप महाडिक

कडेगाव : तालुक्यातील तडसर-चिंचणी सरहद्दीवरील डोंगर काही दिवसांपूर्वी जाळून खाक झाला. डोंगरात वणवा पेटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. त्यामुळे येथील वनसंपदा धोक्यात आली आहे. पेटलेल्या वनव्यात झाडाझुडपांचे व वन्यजिवांचे मरण दिसत असताना, आग विझवण्यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत, हे कडेगाव तालुक्यातील चित्र धक्कादायक आहे. आता शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सह्याद्रीच्या रांगेत येणारे कडेगाव तालुक्‍यातील अनेक डोंगर हे गवताचे आगार म्हणून प्रसिद्ध आहेत. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी वनमंत्री असताना तालुक्यातील डोंगर परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली आहे. या डोंगरांवर सागरेश्वर अभयारण्यातून बाहेर मुक्त संचार करणारे हरीण, चितळ, सांबर, आदी अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे. परंतु, उन्हाळ्यात डोंगरांना वणवा लागण्याच्या प्रकारांत वाढ होत आहे.

डोंगर जळून खाक झाल्यामुळे जनावरांचा चारा नष्ट झाला आहे. तसेच प्राणीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असावेत, अशीही भीती व्यक्त होत आहे. या वणव्यातून वाचलेल्या प्राण्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वणव्यामुळे उजाड झालेल्या डोंगरातील हरणांचा त्रास शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. शेतकऱ्यांची पिके हरणांनी फस्त केली आहेत.

आता वनखात्याने वणवे रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वणवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

चौकट

ठोस उपाययोजनांची गरज

वणवे रोखण्यासाठी वन खात्याकडून होणाऱ्या प्रयत्नांना मर्यादा आहेत. मात्र, गवताचे प्रमाण अधिक असलेल्या डोंगरावर मोठा वणवा पेटतो. वास्तविक काही अटी घालून शेतकऱ्यांना गवत कापून नेण्यास परवानगी दिली आणि चराईबंदी उठवली तर डोंगरातील वनसंपदा जतन करण्यासाठी शेतकऱ्यांचीही मदत होईल.