शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिरसगावच्या निर्धाराला एकीचे बळ

By admin | Updated: March 30, 2017 00:42 IST

पाण्यासाठी प्रयत्न : सरपंचांचा पुढाकार, परिसरातील महाविद्यालयांची साथ

प्रताप महाडिक ल्ल कडेगावनैसर्गिक स्वरुपात उपलब्ध होणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळीत वाढ करण्याची आवश्यकता नेहमीच व्यक्त केली जाते. मात्र प्रत्यक्षात पाणी अडवा, पाणी जिरवाचा प्रकल्प राबविण्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. कडेगाव तालुक्यातील डोंगरकुशीत लपलेल्या शिरसगावचे सरपंच सतीश ऊर्फ संभाजी मांडके यांनी डोंगरउताराला चरी काढून आणि डोंगरातील ओघळी जागोजागी अडवून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे १२ महिने पाण्याचा तुटवडा भासणार नाही, या वस्तुस्थितीचे प्रत्यक्ष कृतीतून दर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.शिरसगाव येथील या ध्येयवेड्या सरपंचाचे प्रयत्न पाहून जवळच्या महाविद्यालयांनी शिरसगावसाठी हा दोन दिवस काम करण्याचा निर्धार केला आहे. जवळच्या ५ महाविद्यालयांतील मुले दि. १ आणि २ एप्रिल या दोन दिवसात श्रमदानातून डोंगरउताराला समतल चरी खोदणार आहेत. याशिवाय डोंगरातील ओघळी जागोजागी अडवून बंधारे घालण्यात येणार आहेत. या सर्व ओघळी एकत्र येणाऱ्या तलावात पाणी साठविले जाणार आहे. त्यामुळे शिरसगाव शिवारात पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याचा विश्वास सतीश मांडके यांना आहे. यामुळेच त्यांनी पाणी अडवाचा प्रस्ताव पुढे आणला आहे. येथे पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीत मुरून परिसरातील भूजल पातळी वाढेल. त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासणार नाही. शिरसगाव येथील ग्रामस्थांनी सरपंचांच्या आवाहनास ग्रामस्थांची साथ असल्याचे सांगितले. श्रमदानासाठी येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तसेच स्वयंसेवी संस्थांच्या तरुणांना डोंगर परिसरात भोजन, नाष्टा, पाणी आदी सुविधा ग्रामस्थांनी केली आहे. जलसिंचनातील आदर्श काम येथे होत आहे. कोणतेही वाहन अथवा यंत्र ज्या ठिकाणी जात नाही, अशा ठिकाणी शासनाच्या मदतीशिवाय श्रमदानातून हे काम होणार आहे.