शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

मराठा आरक्षणासाठी वटहुकूम काढावा

By admin | Updated: October 3, 2016 00:48 IST

भालचंद्र मुणगेकर : इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का नको

 सांगली : राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार बहुमतात असल्याने मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन न घेताही त्यांना निर्णय घेता येऊ शकतो. शासनाने मराठा आरक्षणाचा वटहुकूम काढावा; पण या प्रश्नावर राज्यातील फडणवीस सरकार विलंब करीत असल्याचा आरोप माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी रविवारी सांगलीत केला. ओबीसी, दलित, भटके विमुक्त यांच्या आरक्षणाला धक्का लावण्यास मात्र आमचा विरोध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते समता अभियानांतर्गत विभागीय अधिवेशनसाठी सांगलीत आले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. डॉ. मुणगेकर म्हणाले की, मराठा समाजातही आर्थिक विषमतेविरुद्ध मोठा असंतोष आहे. त्यातून मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघत आहेत. त्यामुळे शासनाने मराठा आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही काही पर्यायही सुचविले आहेत. सध्या भाजप-शिवसेनेचे बहुमतातील सरकार आहे. त्यांनी अधिवेशन न घेता मराठा आरक्षणाचा वटहुकूम काढावा. त्यानंतर अधिवेशनात त्याला मंजुरी घेऊन कायद्यात रूपांतर करावे. दुसरा पर्याय आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा आहे, पण हा निर्णय घेताना मराठा समाजाव्यतिरिक्त इतर समाजातील आर्थिक दुर्बलांनाही आरक्षण द्यावे लागेल. त्यामुळे शासनाने या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञांची बैठक घ्यावी, पण राज्यातील फडणवीस सरकार त्यास विलंब लावत आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने मराठा आरक्षणावर कोणताच निर्णय घेतला नाही. आता उच्च न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी १३ दिवसांची मुदत मागितली आहे. जेवढा विलंब लागेल, तितका असंतोष वाढत जाणार आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत ते म्हणाले की, मराठा समाजाने या कायद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. त्यांनी अवश्य दुरुस्त्या सुचवाव्यात. या दुरुस्त्यांवर जाहीर चर्चा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकारने या कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांची आकडेवारी जाहीर करावी, असेही मुणगेकर म्हणाले. देशातील समाज जाती-जातीत विभागाला गेला, तर देशाचे, राज्याचे आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थैर्य टिकणार नाही, असेही मत त्यांनी मांडले. राज ठाकरे यांना टोला पाकिस्तानी कलाकारांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अभिनेता सलमान खान यांच्यातील टीका-टिप्पणीवर बोलताना मुणगेकर म्हणाले की, भारतातील मुस्लिमांनी हिंदूंना न पटणारी एखादी गोष्ट बोलून दाखविली, तर त्यांना ऊठसूट ‘पाकिस्तानात जा’ म्हणण्याचा अधिकार या मंडळींना कोणी दिला? देशाच्या फाळणीनंतर जे मुस्लिम भारतात राहिले, ते मातृभूमीच्या प्रेमामुळेच. अर्थमंत्र्यांनी नुकतेच ६२ हजार कोटी काळा पैसा उघड झाल्याचे जाहीर केले. त्यांचा धर्म, राष्ट्र कुठला आहे? ते देशद्रोही नाहीत का? या विषयावर आपण एकाच व्यासपीठावर येऊन जाहीर चर्चा करण्यास तयार आहोत, असे आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता दिले. (प्रतिनिधी) प्रतिमोर्चे काढू नयेत मराठा समाजाच्याविरोधात इतर समाजांनी प्रतिमोर्चे काढू नयेत. प्रतिमोर्चे काढून हा प्रश्न सुटणार नाही. मराठा समाजाचे प्रश्न सरकार आणि जनतेला कळले आहेत. त्यामुळे आता या समाजानेही मोर्चे थांबविले पाहिजेत. काँग्रेस आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण दिले. मराठा समाजाच्या शिक्षण व नोकरीतील आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुस्लिम समाजाच्या पाच टक्के आरक्षणापैकी नोकरीतील आरक्षणाला स्थगिती आहे. त्यामुळे सरकारने मुस्लिम समाजाच्या शिक्षणातील आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणीही मुणगेकर यांनी केली.