शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

इस्लामपुरात प्रबोधनात्मक देखाव्यांवर भर

By admin | Updated: September 1, 2014 23:10 IST

परंपरा कायम : आकर्षक मोठ्या मूर्तींसह विद्युत रोषणाईवर अनेक मंडळांचा भर

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील यल्लमा चौक व बुरुड गल्ली परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी हलत्या देखाव्यातून सामाजिक प्रबोधन करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. जयमल्हारचा येळकोट, पितृप्रेम, गोरा कुंभार, भैरवनाथाचे बगाड अशा देखाव्यांची आकर्षक पध्दतीने उभारणी करण्यात आली आहे. तर शहरातील बहुतेक मंडळांनी आकर्षक व मोठ्या उंचीच्या गणेश मूर्ती उभारण्यावर भर दिला आहे.गणेशोत्सव साजरा करण्याची ५८ वर्षांची परंपरा असणाऱ्या बुरुड गल्लीतील श्री बाल गणेश मंडळाने यंदा ‘जयमल्हार’ या मालिकेतील कथानक घेऊन त्याचा हलता देखावा अत्यंत आकर्षक पध्दतीने मांडला आहे. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर होत असताना मनोहारी विद्युत रोषणाईत उधळला जाणारा भंडारा पाहिला की भाविकांना क्षणभर आपण या मल्हाराचे भक्त झाल्याची अनुभूती येते. या देखाव्याने शहरातील भाविकांची गर्दी खेचली आहे.कापूसखेड रस्त्यावरील कलासागर गणेशोत्सव मंडळाने २२ वर्षांच्या परंपरेला साजेशी अशी पितृ प्रेमावरील संवेदनशील देखाव्याची उभारणी केली आहे. आपल्या मुला-बाळांसाठी रात्रंदिन काबाडकष्ट उपसणारा बाप आईच्या तुलनेत थोडासा दुर्लक्षिला जातो. मात्र ज्यावेळी मुलं संकटात सापडतात त्याचवेळी ‘अरे बाप रे’ अशी आरोळी ठोकतात. नेमका हाच धागा पकडून कलासागरच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनातील आईइतकेच बापाचेही महत्त्व आहे आणि त्याचे प्रेमही उत्कट असते अशा संवेदनशील मनाने हा देखावा उभारला आहे. तर श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळाने संत गोरा कुंभार यांची विठ्ठलाचे नाम:स्मरण करताना देहभान हरपून गेल्याचा देखावा सादर केला आहे.सावकार गल्लीतील श्री गणेश मंडळाने भैरवनाथाचे बगाड हा धार्मिक देखाव्याचा विषय साकारून आपल्या श्रध्दास्थानावरील प्रेम व्यक्त केले आहे. शहरात जवळपास ७0 ते ७५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, गांधी चौकातील ‘इस्लामपूरचा महाराजा’ गणेशोत्सव मंडळाने आकर्षक अशा शिश महालची मनोहारी प्रतिकृती साकारली आहे. विद्युत रोषणाईच्या नेत्रदीपक प्रकाश योजनेमुळे या झळाळणाऱ्या शिश महालातून भाविकांचा पाय निघता निघत नाही, अशी भावना निर्माण होत असते. बसस्थानक रस्त्यावरील लोकनेते राजारामबापू पाटील गणेशोत्सव मंडळाने देहू येथील तुकाराम गाथा मंदिराची अतिभव्य अशी प्रतिकृती उभारली असून, आकर्षक मूर्ती व विद्युत रोषणाईने भाविकांना प्रत्यक्ष तुकाराम महाराजांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. लाल चौकातील सिध्दिविनायक गणेशोत्सव मंडळाने नयनरम्य अशी संगीतावरील विद्युत रोषणाई केली आहे. सप्तर्षी, साथीदार, भाजी मंडई गणेश मंडळ, शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ, वळसे गल्लीतील शिवसागर गणेश मंडळांनी आकर्षक मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. (वार्ताहर)धार्मिक सलोखा...इस्लामपूर शहराला हिंदू-मुस्लिम ऐक्याची मोठी परंपरा आहे. संत- सुफींची पांढरी म्हणून या शहराची ख्याती आहे. शहरातील प्रत्येक सण, उत्सवात सर्वधर्मीय नागरिक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात. व्यक्तीगत आणि धार्मिक अभिनिवेश बाजूला ठेवून समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा संदेश देणाऱ्या या गणेशोत्सवाच्या उपक्रमातील सर्वांचा सहभाग हा सामाजिक आनंद द्विगुणित करणारा असतो. दिवाळीवेळी आकर्षक गडकिल्ल्यांची उभारणी करुन महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याची इत्यंभूत माहिती देणारा मुस्लिम समाजातील आझाद मुल्ला या युवकाने यंदा तेवढ्याच उत्साहाने श्रीगणेशाचीही प्रतिष्ठापना केली आहे. शहरातील गणेशोत्सव हा समाजातील सर्व घटकांच्या दृष्टीने आनंद सोहळाच ठरत आला आहे.