शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चक्का जाम!

By admin | Updated: January 31, 2017 23:57 IST

मराठा समाज दोन तास रस्त्यावर : ४७४ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

सांगली : मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी सांगलीसह सर्वत्र दोन तास ‘चक्का जाम’ आंदोलन झाले. त्यामुळे अनेक मार्गांवर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. ६ मार्चपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मंत्र्यांना फिरू द्यायचे नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. जिल्ह्यातील ४७४ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, काही वेळाने सोडून दिले. जिल्ह्यात सर्वत्र या आंदोलनास पाठिंबा मिळाला. सांगलीत अंकली फाटा, इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा, कर्नाळ रस्ता, कुपवाड रस्त्यावर भारत सूतगिरणी, सांगलीवाडी टोल नाका, माधवनगर रस्त्यावर साखर कारखान्यासमोर, पुणे-बंगलोर महामार्गावर वाघवाडी फाटा, मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा, आष्टा, बावची फाटा, घाटनांद्रे, नागज फाटा, दिघंची, आटपाडी, देशिंग, भिवघाट, कवठेमहांकाळ, जत, उमदी, पलूस, कडेगाव, रामानंदनगर, पाचवा मैल, भिलवडी, अंकलखोप, वसगडे, कवठेएकंद, तासगाव, शिराळा, कासेगाव येथे ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी ४७४ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन, काही वेळाने सोडून दिले.आंदोलनात तरुणांचा सहभाग मोठा होता. जिल्हाभर आंदोलन करून मराठी बाणा दाखवून दिला, असे संजय देसाई व डॉ. संजय पाटील यांनी यावेळी सांगितले. सांगलीतील आंदोलनामध्ये पृथ्वीराज पवार, शिवाजी मोहिते, संग्राम चव्हाण, सतीश साखळकर, योगेश पाटील, श्रीरंग पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी पोळ, विजय भोसले, योगेश पाटील, सुधीर भगत, नीलेश पाटील, महेश खराडे, सुधाकर पाटील, माधवनगर रस्त्यावर अक्षय पाटील, आटपाडी येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, तर आष्ट्यात वैभव शिंदे, सुयोग औंधकर सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शन आंदोलनावेळी वाहनांवर दगडफेकीसारखे प्रकार होणार नाहीत, शांततेच्या मार्गानेच ‘चक्का जाम’ केले जाईल, कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावणाऱ्या घोषणा दिल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली. मराठा समाजाच्या आंदोलकांनी पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शन घडविले.