शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पाच वर्षात डिजिटल युग अवतरेल

By admin | Updated: August 29, 2016 00:16 IST

प्रदीप लोखंडे : सांगलीच्या ब्रॅन्डिंगसाठी जोरदार प्रयत्न गरजेचे

सांगली : भारत वेगाने बदलत असून, त्याला कुणीही रोखू शकत नाही. आगामी पाच वर्षात नव्या तंत्रज्ञानाचे डिजिटल युग अवतरेल, असे मत रुरल फौंडेशनचे प्रदीप लोखंडे यांनी शनिवारी सांगलीत व्यक्त केले. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ सांगलीत पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड होते. यावेळी लोखंडे म्हणाले की, सांगलीचे ब्रँडिंग करणे शक्य आहे. बुध्दिबळ, हळद, सैनिकांची परंपरा हे सांगलीचे ब्रँड आहेत. त्याचे भांडवल करावे. भारत वेगाने बदलतोय, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. देशाच्या उभारणीत बांधकाम व्यावसायिकांचे योगदान मोठे आहे. लोकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांचा वाटा आहे. पुढच्या पाच वर्षात ९० टक्क्यापेक्षा जास्त ठिकाणी आॅनलाईन काम सुरु होईल. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, सांगलीचे ब्रँडिंग करताना कृष्णा नदी ही ताकद होती. शहरातील रस्त्यांची अवस्था विचित्र आहे. दोन रस्ते का चांगले करता येत नाहीत. काळी खण सुशोभिकरणाचा पहिला टप्पा क्रीडाई करणार आहे. क्रीडाईने वृध्दांसाठी स्कीम कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. क्रीडाईचे राज्य उपाध्यक्ष राजीव परीख, नूतन अध्यक्ष विकास लागू, सचिव उपस्थित होते. योगेश कुलकर्णी, दीपक सूर्यवंशी, रवींद्र खिलारे, किशोर पटवर्धन उपस्थित होते. राजीव परीख, दीपक सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव योगेश कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)