शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

चार महिन्यांत पाचवेळा पंचनाम्याची वेळ

By admin | Updated: March 16, 2015 00:05 IST

अवकाळीने नुकसान : रविवारी पहाटेपर्यंत पावसाचा मुक्काम, पपई, केळीच्या बागा जमीनदोस्त

सांगली : अवकाळी पावसाने खेळ मांडल्याने शेतकरी, बागायतदारांचे गेल्या चार महिन्यांपासून हाल सुरू आहेत. प्रशासकीय पातळीवरही एक पंचनामा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या पंचनाम्याची तयारी करावी लागत आहे. गेल्या चार महिन्यांत पाचवेळा फेरपंचनामे करण्यात आले. यापैकी एका पंचनाम्यातील नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या चार महिन्यात पाचव्यांंदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने प्रशासनाला पाचव्यांदा फेरपंचनाम्याचे आदेश देण्याची वेळ आली आहे. दरम्यान, काल रात्रीपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, दिवसभर उकाडा राहिल्याने बेदाणा, द्राक्ष, डाळिंब बागायतदारांमध्ये धडकी कायम आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी आदी तालुक्यांमध्ये रात्री तुरळक पावसाने हजेरी लावली. शनिवारी खानापूर, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. खानापूर पूर्व भागात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला. जिल्ह्यामध्ये गेल्या चार महिन्यात पाचव्यांदा अवकाळी पावसाने दणका दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी, त्यानंतर मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अवकाळीने हजेरी लावली आहे. (प्रतिनिधी)चार कोटी रुपये नुकसानभरपाईमार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे पूर्णत्वास आले होते. असे असतानाच दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वच तालुक्यात पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक शिरीष जमदाडे यांनी दिली. पहिल्या आठवड्यातील पावसाचे सुमारे आठ हजार पाचशे हेक्टरवरील शेतीपिकाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जादा २ हजार २२६, तर ३ हजार ९१२ हेक्टरवर ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. डिसेंबरअखेर झालेल्या अवकाळीचे पंचनामे पूर्ण झाले असून, याच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून चार कोटी रुपये आले आहेत. याचे वितरणही सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. आळसंदमध्ये रासायनिक खताचे ६ लाखांचे नुकसानआळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे काल शनिवारी सायंकाळी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. आळसंद येथील माजी सरपंच प्रकाश यशवंत जाधव यांच्या मालकीचे यशवंत कृषी केंद्राच्या रासायनिक खताच्या गोडावूनचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने खतांची सर्वच्या सर्व पोती भिजली. त्यामुळे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक घरांवरील कौले व जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.