शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पाच दुकानदारांना ६० हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिनी लॉकडाऊनमधील नियमांचा भंग करून दुकाने सुरू ठेवल्याबद्दल सोमवारी महापालिका व पोलिसांनी कारवाईचा बडगा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मिनी लॉकडाऊनमधील नियमांचा भंग करून दुकाने सुरू ठेवल्याबद्दल सोमवारी महापालिका व पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शहरातील पाच दुकानदारांवर कारवाई करत ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ‘ब्रेक द चेन’ या शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अभियानानुसार अत्यावश्‍यक सेवांची दुकाने वगळून अन्य कोणत्याही आस्थापना सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही सोमवारी काही आस्थापना सुरू झाल्या होत्या. उपायुक्त राहुल रोकडे, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी शहरात फिरून दुकानांवर कारवाई केली. यात सरगम, न्यू बालाजी, बालाजी कस्टम, तसेच न्यू संदीप मोबाईल आणि पॅराडाईज शूज या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोविड निवारणासाठी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार सर्वांनी अत्यावश्‍यक सेवेच्या आस्थापना सोडून अन्य आस्थापना उघडू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या कारवाईत आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त एस. एस. खरात, अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक माने, रूपाली गायकवाड, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने आदींनी सहभाग घेतला.

चौकट

विनामास्क २७ जणांवर कारवाई

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी माजी सैनिकांचा टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सकडून मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी या टास्क फोर्सने विनामास्क फिरणाऱ्या २७ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ४२०० रुपये दंड वसूल केला.