शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मेणीजवळ दरोडेखोरांची पाचजणांना मारहाण

By admin | Updated: November 2, 2016 00:30 IST

एक जखमी : पाच तोळे दागिन्यांसह रोकड लुटली

येळापूर/कोकरूड : मेणीपैकी आटुगडेवाडी (ता. शिराळा) येथील यादव वस्तीवर दरोडेखोरांनी एकाच कुटुंबातील पाचजणांना मारहाण करत पाच तोळे सोन्याचे दागिने, दहा हजारांची रोकड असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. यामध्ये बाळू विठ्ठल यादव (वय ४७) जखमी झाले असून, त्यांच्यावर शेडगेवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद कोकरूड पोलिसांत करण्यात आली आहे. मेणीपैकी आटुगडेवाडी ही वाडी कऱ्हाड-शेडगेवाडी मार्गावर असून, या वाडीतील विठ्ठल यादव गेल्या चाळीस वर्षांपासून वस्तीवर वडील विठ्ठल यादव, आई वैजयंता यादव (वय ६०), चुलती जनाबाई महादेव यादव (७५), पत्नी सुमन (४२) आणि बहीण मालूताई बाळकृष्ण बांदल (४०) यांच्यासोबत राहतात. याच ठिकाणी त्यांची सर्व जमीन असून, त्यांचा वाडीशी अत्यंत कमी संपर्क आहे. यादव वस्ती व वाडीमधील अंतर एक किलोमीटर आहे. या वस्तीवरील यादव कुटुंबीय लक्ष्मीपूजनानंतर झोपी गेले असता, मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांचे कुत्रे जोराने भुंकू लागले. तो आवाज ऐकून बाळू यादव यांचे वडील विठ्ठल यादव बाहेर आले. त्यावेळी दबा धरून बसलेले सहा ते सात दरोडेखोर पुढे आले. विठ्ठल यादव यांचे तोंड दाबून सर्वजण घरात शिरले. दरोडेखोरांनी घरातील चार महिलांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची बोरमाळ, अर्धा तोळ्याची तीन मंगळसूत्रं, दोन तोळ्यांचे गंठण, तसेच वैजयंता यादव यांच्या बटव्यातील दहा हजार अशी रक्कम हिसकावून घेतली. चौघींना मारहाणही केली. बाळू यादव यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्या उजव्या हातावर व पाठीवर वार करण्यात आले. बाळू यादव यांचे वडील आजारी असून, घरातील महिलांना विरोध करता आला नाही. सर्व ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. ते सर्व परिसरातील बोली भाषेतच बोलत होते. बाळू यादव यांनी कोकरूड पोलिसांना तातडीने कळविले. या प्रकाराने कुटुंबातील महिला भयभीत झाल्या आहेत. जखमी यादव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. (वार्ताहर)