शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा गर्भपातप्रकरणी पाच आमदारांची लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:03 IST

सांगली : सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पाच आमदारांनी लक्षवेधी सादर केली आहे. मंगळवारी सभागृहाच्या विषयपटलावर ...

सांगली : सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात पाच आमदारांनी लक्षवेधी सादर केली आहे. मंगळवारी सभागृहाच्या विषयपटलावर लक्षवेधी येऊन याप्रकरणी चर्चा होणार आहे. शासनाने मागितलेले अहवाल व कागदपत्रे घेऊन महापालिका अधिकारी अधिवेशनास रवाना झाले आहेत.काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगलीच्या गणेशनगर येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये छापा टाकून बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उजेडात आणले होते. राज्यभर हे प्रकरण गाजले. पोलिसांनी याप्रकरणी डॉ. विजयकुमार शामराव चौगुले व त्यांच्या पत्नी डॉ. रूपाली चौगुलेस अटक केली होती. रुग्णालयावर टाकलेल्या छाप्यात गर्भपाताचे साहित्य, औषधी गोळ्या, इंजेक्शनचा साठा जप्त केला होता. गर्भपात केलेल्या महिलांचे केसपेपर व तसेच आक्षेपार्ह कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिलांचा गर्भपात या रुग्णालयात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्येचे प्रकरण ताजे असतानाच, सांगलीतील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणामुळे राज्यभर याची चर्चा झाली. गर्भपात प्रकरणातील संशयित डॉ. रूपाली चौगुले आणि डॉ. विजयकुमार चौगुले शासकीय सेवेत होते.त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांची सनद रद्द होण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला होता. या प्रकरणाच्या चौकशीबाबत आता अनेक पक्ष, संघटना प्रश्न उपस्थित करीत आहेत.कागदपत्रांसह अधिकारी रवानागर्भपात प्रकरणाबाबत शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश फतेपेकर, आमदार सुनील शिंदे, भाजपचे आमदार संजय सावकारे व आमदार सुधाकर कोल्हे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. त्यामुळे आयुक्तांना याबाबत दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली. त्यानंतर महापालिकेचे आरोग्याधिकारी सुनील कवठेकर कागदपत्रे घेऊन अधिवेशनासाठी रवाना झाले आहेत.