शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमार्गावरील ढिगारा कोसळून पाच जखमी

By admin | Updated: January 24, 2016 00:20 IST

अंकलीतील घटना : भुयारी मार्गाचे काम सुरू असताना अपघात; जखमींमध्ये रेल्वे अधिकारी, कर्मचारी

मिरज : मिरज-जयसिंगपूरदरम्यान रेल्वेमार्गावर अंकली येथे रेल्वेफाटकाखालून भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरू असताना, शनिवारी मातीचा ढिगारा पडून रेल्वे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारासह पाचजण जखमी झाले. जखमींना मातीच्या ढिगाऱ्यातून काढून मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास तीन तास विलंब झाला. मिरज विभागाचे रेल पथनिरीक्षक सायमन पुट्टाप्पा, सहायक रेल्वे अभियंता समीर सातारकर, मुकादम हणमंता यल्लाप्पा, ठेकेदार व्यंकटेश हणमंता भंडारी (सर्व रा. मिरज) आणि एक मजुराचा जखमीत समावेश आहे. मिरज ते कोल्हापूरदरम्यान मानवरहित रेल्वे फाटक बंद करून वाहतुकीसाठी भुयारी मार्ग तयार करण्यासाठी गेले तीन आठवडे मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. अंकली येथे गेट क्रमांक चारजवळ शनिवारी मध्यरात्री भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरू होते. जेसीबीने रेल्वे मार्गाखालील माती खोदून मोठ्या आकाराचे सिमेंट ब्लॉक बसविण्यात येत होते. जेसीबीने काढलेल्या मातीचे ढीग रेल्वे मार्गाशेजारी होते. मध्यरात्री चार वाजता सिमेंट ब्लॉक रेल्वेमार्गाखाली ओढण्यात येत असताना ढिगाऱ्यावरील कामगारांच्या धक्क्याने मातीचा ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याजवळ रेल्वे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व मजूर असे अकराजण थांबले होते. ढिगारा अंगावर पडल्याने पाचजण ढिगाऱ्याखाली अडकले. जेसीबीने माती बाजूला काढून अडकलेल्या पाचजणांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर मिरजेत खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. भुयारी मार्गाचे काम सुरू असताना रेल्वे अधिकारी कर्मचारी अपघातात जखमी झाल्याच्या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती. मिरजेतील रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपघाताच्या घटनेमुळे रेल्वे वाहतूक सुरू होण्यास तब्बल तीन तास विलंब झाला. सकाळी सहाऐवजी नऊ वाजता मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू झाली. (वार्ताहर) दुरुस्तीस विलंब : प्रवाशांचे झाले हाल शनिवारी मध्यरात्री एक ते सकाळी सहापर्यंत मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र अपघातामुळे सकाळी नऊ वाजता रेल्वे वाहतूक सुरू झाली. कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पहाटे साडेचार, महालक्ष्मी एक्स्प्रेस मिरजेत थांबविण्यात आल्या होत्या. कोल्हापुरातून येणारी कोयना एक्स्प्रेस जयसिंगपूर येथे थांबविण्यात आली होती. भुयारी मार्गाचे काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने सकाळी नऊनंतर मिरज-कोल्हापूर वाहतूक सुरळीत झाली. रेल्वेमार्ग सुरू होण्यास विलंब झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. मिरज-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद शनिवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत मेगाब्लॉकमुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद होती. मेगाब्लॉक व अपघातामुळे सकाळी सह्याद्री एक्स्प्रेस व महालक्ष्मी एक्स्प्रेस तीन तास विलंबाने कोल्हापूरला रवाना झाली. सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेत थांबविण्यात आली होती. कोल्हापुरातून सुटणारी पुणे पॅसेंजर व हैदराबाद एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात आली.