शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन

By admin | Updated: May 12, 2017 23:48 IST

इस्लामपुरात स्मशानभूमीत भरले पहिले कविसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : जगाला शांततेचा संदेश देत असताना, अंधश्रध्दा नाहीशी व्हावी आणि मानव निसर्गवादी बनावा, निर्भीड बनावा यासाठी भगवान गौतम बुध्दांनी जगाला अनेक तत्त्वे दिली. निसर्गवादाबरोबर मानवतावादही त्यांनीच दिला. बुध्द विचाराने जगाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सूरज चौगुले यांनी केले.येथील लोकराज्य विद्या फौंडेशनच्यावतीने गौतम बुध्दांच्या जयंतीनिमित्त कापूसखेड नाका येथील स्मशानभूमीत आयोजित पहिल्या परिवर्तनवादी कविसंमेलनात ते बोलत होते. स्मशानभूमीत आयोजन होणारे हे पहिलेच कविसंमेलन ठरल्याचे ‘लोकराज्य’चे संस्थापक चंद्रशेखर तांदळे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. माजी नगरसेवक विजय कुंभार अध्यक्षस्थानी होते. कुंभार म्हणाले की, स्मशानभूमी हे आयुष्याला पूर्णविराम देणारे ठिकाण आहे. मात्र लोकराज्यमुळे स्मशानभूमी परिवर्तनाचे व्यासपीठ बनतील. समाजाने गौतम बुध्दांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे.रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव अरुण कांबळे, प्रा. रामचंद्र घुले, सागर मलगुंडे, अमित कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. कविसंमेलनात बजरंग गावडे यांनी ‘स्मशानातून स्मशानाकडे जाताना अखेर निराशा झाली, प्रेतासमोर शितोंडी धरताना परकी सारी आपली झाली’ ही कविता सादर केली. डॉ. मीनाक्षी नांगरे, रवी बावडेकर, भानुदास आंबी, सुधीर बंडगर, राजेंद्र शिंदे, विजय जाधव, पी. व्ही. मुळे, चंद्रकांत कणेरे, रामचंद्र गलांडे यांनीही कविता सादर केल्या.यावेळी नगरसेवक अमित ओसवाल, प्रा. डॉ. जयवंत खरात, पोपट कोळेकर, सागर चव्हाण, अशोक पाटील, प्रा. अरुण घोडके, निरंजन पाटील, वैभव खोत, विकास वाघमोडे, विवेक तांदळे, विनोद राठोड, आकाश कुचीवाले, विवेक जगताप, ऋषिकेश पाटील उपस्थित होते. मानसिंग ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश मोरे यांनी आभार मानले.