शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

सांगली महापालिकेच्या ‘स्थायी’ची पहिलीच सभा वादळी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:15 IST

सांगली : महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळातील पहिलीच स्थायी समितीची सभा सोमवारी होत आहे. सभेत रिक्षा घंटागाडी खरेदीचा विषय चांगलाच गाजणार आहे. पारदर्शी कारभाराच्या आश्वासनाला तडा देणारा हा विषय सत्ताधारी भाजपचे सदस्य कशाप्रकारे हाताळतात, यावर भविष्यातील दिशा ठरणार आहे. सध्या तरी काँग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवकांच्या हाती रिक्षा घंटागाड्या खरेदीच्या विषयाने आयतेच कोलित ...

सांगली : महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळातील पहिलीच स्थायी समितीची सभा सोमवारी होत आहे. सभेत रिक्षा घंटागाडी खरेदीचा विषय चांगलाच गाजणार आहे. पारदर्शी कारभाराच्या आश्वासनाला तडा देणारा हा विषय सत्ताधारी भाजपचे सदस्य कशाप्रकारे हाताळतात, यावर भविष्यातील दिशा ठरणार आहे. सध्या तरी काँग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवकांच्या हाती रिक्षा घंटागाड्या खरेदीच्या विषयाने आयतेच कोलित मिळाले आहे.महापालिका प्रशासनाने २.८७ कोटी रुपयांना ४० रिक्षा घंटागाड्या खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खरेदी धोरणांतर्गत गव्हर्न्मेंट ई मार्केटप्लेस (जीईएम) या पोर्टलवरून रिक्षा घंटागाड्यांची खरेदी केली जाणार आहे. पोर्टलच्या दराने एक रिक्षा घंटागाडी ७ लाख १८ हजारांना मिळणार आहे. स्थानिक डीलरकडे हीच रिक्षा घंटागाडी सर्व करांसह साडेचार लाखांपर्यंत मिळते. एका रिक्षामागे किमान दोन ते अडीच लाखाचा घाटा आहे.त्यात घनकचरा प्रकल्पाच्या स्क्रोल खात्याऐवजी चौदाव्या वित्त आयोगातून २ कोटी ८८ लाख खर्चून या रिक्षा घंटागाड्या खरेदीचा प्रस्ताव तयार झाला आहे. मात्र प्रत्यक्षात वित्त आयोगाच्या खात्यावर केवळ एक कोटी ४७ लाख रुपयेच शिल्लक आहेत. तसा शेरा मुख्य लेखाधिकाऱ्यांनी मारला आहे. त्यामुळे उर्वरित दीड कोटीची रक्कम कोणत्या खात्यातून वर्ग होणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. त्याबाबत प्रस्तावात कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. एकूणच रिक्षा घंटागाड्या खरेदी वादाच्या भोवºयात सापडली आहे. या विषयामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला भाजपविरोधात आयतेच कोलित मिळाले आहे.आता भाजपने ही खरेदी ई निविदा पद्धतीने करण्याचे जाहीर करून, डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे. पण स्थायी समितीत काय निर्णय होतो, याकडे मात्र साºयांचेच लक्ष लागले आहे.पोर्टलचे : निकष...पोर्टलच्या निकषानुसार पाच हजार रुपयांपर्यंतच खरेदी असेल तर दरपत्रके, निविदा न मागविता ती खरेदी करावी, असे म्हटले आहे. पण त्याचा दर हा बाजारभावापेक्षा जास्त असू नये. खरेदीचे मूल्य तीन लाखांपेक्षा जास्त नसावे, असे निकष आहेत. शिवाय मोटार वाहने खरेदी ही एक कोटीपेक्षा जास्त असल्यास ती ई- निविदांमार्फत करण्यात यावी. जेणेकरून यातून महापालिकेला स्पर्धात्मक खरेदीतून स्वस्तात गाड्या मिळू शकतील आणि जनतेच्या कराचा पैसा वाचेल, असा उद्देश आहे.