शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम कोरोना चाचणी... नंतरच व्यवसाय सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

विटा नगरपरिषदेने शहरातील दुकाने उघडण्यापूर्वी सर्व व्यापारी व त्यांच्या कामगारांची पहिल्यांदा कोरोना चाचणी घेण्याची मोहीम सुरू केली आहे. लोकमत ...

विटा नगरपरिषदेने शहरातील दुकाने उघडण्यापूर्वी सर्व व्यापारी व त्यांच्या कामगारांची पहिल्यांदा कोरोना चाचणी घेण्याची मोहीम सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : गेल्या महिनाभराच्या कडक निर्बंधानंतर प्रशासनाने व्यवसाय सुरू करण्यास शिथिलता दिल्याने विटा शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरपालिका प्रशासनाने, व्यापाऱ्यांनी प्रथम कोरोना चाचणी करूनच मग व्यवसाय सुरू करण्याचा आदेश देत, व्यापाऱ्यांची चाचणी घेण्याची मोेहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील सुमारे ३६० व्यापारी व तेथील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्यातील २ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

विटा शहरात निर्बंध शिथिल केल्यानंतर दुकाने, व्यापारी बाजारपेठ, भाजी मंडई यांसह अन्य दुकाने सुरू झाली आहेत. मात्र, शासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी पहिल्यांदा व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेऊनच दुकाने उघडण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने भाजी मंडईतील १०८ व्यापाऱ्यांची चाचणी घेतली. त्यात एक पॉझिटिव्ह आला. त्यानंतर व्यापारी संकुलातील १२४ व्यापाऱ्यांच्या घेतलेल्या चाचणीत सर्वजण निगेटिव्ह आले. तसेच १२८ शेतकरी व्यापाऱ्यांची चाचणी घेण्यात आली, त्यातही एक पॉझिटिव्ह सापडला आहे.

विटा नगरपरिषद प्रशासनाने आतापर्यंत ३६० व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी घेतली असून उर्वरितांची चाचणी घेण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. व्यापारी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले आहे.

या मोहिमेत ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. दीपाली गायकवाड, डॉ. अभिजित निकम, डॉ. नीलम मणेर, डॉ. वृषाली कुलकर्णी, व्ही. डी. पवार, विनायक जोशी, अझर मुल्ला, नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, सलीम शेख सहभागी झाले होते.