शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आधी महापौर बदल, मगच जिल्हा परिषदेत लक्ष घालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST

सांगली : आधी महापौरपदाचे बघतो, मगच जिल्हा परिषदेत लक्ष घालेन, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. जिल्हा ...

सांगली : आधी महापौरपदाचे बघतो, मगच जिल्हा परिषदेत लक्ष घालेन, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासंदर्भात भाजप सदस्य पाटील यांना भेटले. अध्यक्ष बंगल्यावर सकाळी सुमारे पाऊण तास चाललेल्या बैठकीत पाटील यांनी सर्व सदस्यांचे म्हणणे एकत्रित ऐकून घेतले.

पाटील यांनी प्रत्येक सदस्याला एकेकटे भेटण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण सदस्यांनी एकत्र म्हणणे मांडण्याची तयारी दर्शविली. अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह सर्व विषय समित्यांच्या सभापतींनी सुरुवातीला पाटील यांची भेट घेतली, त्यानंतर सदस्यांनी त्यांच्यापुढे एकत्रित म्हणणे मांडले. यावेळी पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी मात्र बाहेरच थांबून होते. सदस्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक गतिमान व्हायचे तर पदाधिकारी बदल झाला पाहिजे. सर्व सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे अस्वस्थता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे बदल करण्याशिवाय गत्यंतर नाही.

सदस्यांनी सांगितले की, कारभारात सुधारणा झाली नाही तर येत्या निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागेल. त्यासाठी पदाधिकारी बदल व्हायला हवा. जिल्हा परिषदेत अधिकारी मुजोर झाले असून, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातून जिल्हा परिषदेची राज्यभरात बदनामी होत आहे. जिल्हा परिषदेत सदस्यांनी यावे की नाही अशी स्थिती आहे. ही प्रतिमा उजळवायची तर तातडीने पावले उचलायला हवीत.

चर्चेत डी. के. पाटील, संग्रामसिंह देशमुख, रवी पाटील, सुरेंद्र वाळवेकर, सरदार पाटील, अरुण बालटे, संपतराव देशमुख, शोभा कांबळे, सुरेखा जाधव, सरिता कोरबू, शांता कनुजे आदी सदस्यांनी भाग घेतला. निवेदनही दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, या बैठकीपूर्वी कोअर कमिटीच्या सदस्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनीदेखील बदलासंदर्भात अनुकूलता दर्शविली आहे. सध्या महापौर बदलाची प्रक्रिया तोंडावर आहे. २२ फेब्रुवारीला त्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील बदलाविषयी चर्चा करू. २५ फेब्रुवारीस पुन्हा येणार आहे, तेव्हा त्याचा निर्णय होईल. एकाचवेळी दोन संस्थांमधील बदलाची चर्चा नको.

चौकट

शब्द दिलाय, पाळलाच पाहिजे

सदस्यांनी पाटील यांना सांगितले की, सध्याच्या पदाधिकारी निवडीवेळी वर्षभराची मुदत दिली होती. त्यानंतर बदल करण्याचा शब्द दिला होता. तो पाळायला हवा. सध्या वर्ष संपून गेल्याने बदलाचा विचार झाला पाहिजे. पाटील यांनी त्याला सकारात्मकता दर्शविली.