शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साळशिंगेत साकारले राज्यातील पहिले ‘पुस्तकांचे घर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:37 IST

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : ग्रामीण भागात शिक्षण आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी साळशिंगे (ता. ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : ग्रामीण भागात शिक्षण आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी साळशिंगे (ता. खानापूर) येथील रेवणसिध्द शहाजी कदम या युवकाने कुटुंबियांच्या मदतीने राज्यातील पहिले ‘पुस्तकाचं घर’ साकारले आहे. शालेय पुस्तकांसह बालकथांपासून स्पर्धा परीक्षेपर्यंतची सुमारे एक हजारावर पुस्तके मोफत उपलब्ध करून देऊन, या कुटुंबाने घराचे रूपांतर वाचनालयात केले आहे.साळशिंगेचा रेवणसिध्द कदम कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात बी. ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, तसेच या मुलांसह लोकांना विविध क्षेत्रांची माहिती व्हावी, या हेतूने युवा फौंडेशनच्या माध्यमातून आणि कुटुंबियांच्या मदतीने रेवणसिध्दने ‘पुस्तकाचं घर’ तयार केले आहे. त्याने सामाजिक चळवळीचे प्रणेते डॉ. प्रकाश आमटे यांची प्रेरणा घेतली आहे. गावातील लोकांना व गरजू विद्यार्थ्यांना कदम कुटुंबाने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ होत आहे. येथून पुस्तक घरी घेऊन जाऊन वाचण्याची सोय करण्यात आली आहे.प्रत्येक रविवारी नवीन पुस्तक देऊन दुसºया रविवारी ते जमा करून घ्यायचे व त्याचवेळी दुसरे पुस्तक द्यायचे, असा नित्यक्रम सुरू आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.दुष्काळी खानापूर तालुक्यातील साळशिंगे या खेडेगावात राज्यातील पहिले ‘पुस्तकाचं घर’ तयार झाले आहे. आता या घरात पुस्तकांची संख्या वाढविण्याचा निश्चय करण्यात आला आहे.युवकांना सशक्त बनविण्याचा संकल्पयुवकांनी धैर्याने आणि शौर्याने राष्टÑनिष्ठा, बंधुभाव, समानता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. भरकटलेल्या युवकांना सशक्त, साहसी, निर्भय आणि चारित्र्यसंपन्न बनविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठीच ‘पुस्तकाचं घर’ तयार केल्याचे रेवणसिध्द कदमने सांगितले.