शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत अतिक्रमण हटावचा फार्स

By admin | Updated: December 30, 2015 00:49 IST

स्टेशन रोड, रेल्वे स्थानक परिसरात कारवाई : हातगाडे, विक्रेते हटविले

मिरज : मिरजेत स्टेशन रोड, रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणे मंगळवारी हटविण्यात आली. रस्त्यावरील विक्रेते, हातगाड्या, फलक, छपऱ्या काढून अतिक्रमण हटविण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. अतिक्रमणे हटविताना काहींचे महापालिका कर्मचाऱ्यांसोबत वादावादीचे प्रकार घडले.महापालिका सहायक आयुक्त टीना गवळी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्टेशन रोड, रेल्वे स्थानक परिसर, हिरा हॉटेल चौकातील दुकानांसमोरील फलक व अतिक्रमणे काढली. लोखंडी छपऱ्या काढण्यासाठी कटर उपलब्ध न झाल्याने ही मोहीम दुपारनंतर थांबविण्यात आली होती. अतिक्रमणे हटविण्यास दुकानदारांनी विरोध केल्याने वादावादीचे प्रकार घडले. सोमवारी मार्केट परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र मंगळवारी पुन्हा विक्रेते रस्त्यावर बसले होते. विनापरवाना बांधण्यात आलेली पक्की बांधकामे पाडण्याचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे केली आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पक्की बांधकामे काढण्याबाबत अद्याप आदेश दिलेले नसल्याने, रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात येत असल्याचे टीना गवळी यांनी सांगितले. शहरातील लोणी बाजार, दत्त चौक परिसरातील रस्त्यावरील भाजी बाजार, बालगंधर्व नाट्यगृह ते मालगाव वेस, गांधी चौक, शिवाजी रस्ता ते बसस्थानक, ईदगाहनगर रस्ता रुंदीकरण, पोलीस ठाणे ते हिरा हॉटेल चौकापर्यंतचे रस्ते रुंदीकरण यासह शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण गेली अनेक वर्षे रखडले आहे. रस्त्यावरील हातगाड्या व विक्रेत्यांना हटविण्याऐवजी रखडलेले प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण सुरु करण्याची नागरिकांची मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेची चौकशी केली. मात्र कारवाईसाठी कोणीही उपस्थित नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)पोलिसांचे असहकार्यमिरजेत अतिक्रमणे हटविण्यास जोरदार विरोध होत असल्याने महापालिकेने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी, बंदोबस्त लगेच देता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने, पोलीस अधीक्षकांकडून बंदोबस्ताची मागणी केल्याचे टीना गवळी यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्ताशिवाय अतिक्रमणे काढणे कठीण असल्याने, बंदोबस्त मिळाला नाही, तर बुधवारपासून अतिक्रमणे हटविण्याची कारवाई थांबविणार असल्याचे गवळी यांनी सांगितले.