शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तील एक हजार रिक्षांमध्ये ‘अग्निशमन’ -लोकमत विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:02 IST

कऱ्हाड : आगीसारख्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी अनेक शासकीय कार्यालय व खासगी कंपन्यांमध्ये ‘अग्निशमन यंत्र’ बसविण्यात आले आहे.

सचिन काकडे।कऱ्हाड : आगीसारख्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी अनेक शासकीय कार्यालय व खासगी कंपन्यांमध्ये ‘अग्निशमन यंत्र’ बसविण्यात आले आहे. आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कऱ्हाडतील रिक्षा चालकांनीही पुढाकार घेतला असून, गॅस किट असलेल्या तब्बल एक हजार रिक्षांना ‘अग्निशमन यंत्र’ बसविण्यात आले आहे.

कऱ्हाड शहरात परवानाधारक तब्बल ५ हजार रिक्षा आहेत. यामध्ये गॅस किट असलेल्या सुमारे दीड हजार रिक्षा आहेत. उन्हाळ्यात गॅस किट असलेल्या रिक्षा या तापण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे अशा रिक्षांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. ज्या रिक्षांना अग्निशमक यंत्र असेल, अशा रिक्षांच्या परवान्याचेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नूतनीकरण केले जाते. गॅस किट असलेल्या रिक्षांना अग्निशमन यंत्र बसवणे बंधनकारण असताना आता स्वत: रिक्षाचालकांनी स्वत:च्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला आहे. जवळपास एक हजार रिक्षा चालकांनी ‘अग्निशमन यंत्र’ बसविले आहे.हाताळण्याचे मार्गदर्शनही घेतले...शहरातील अनेक रिक्षाचालकांनी अग्निशमन यंत्र बसविण्यावर भर दिला आहे. या यंत्राचा कशा प्रकारे वापर करायला हवा, याची माहितीही अनेकांनी जाणून घेतली आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास तातडीचा उपाय म्हणून या अग्निशमन यंत्राची मोठी मदत होणार आहे, अशी माहिती शहरातील काही रिक्षा चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

शहरातील हजारो नागरिक रिक्षाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही गॅस किट असलेल्या रिक्षांना ‘अग्निशमन यंत्र’ बसविले आहे. भविष्यात आगीसारख्या घटना घटल्यास आग आटोक्यात आणण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे.- जालिंदर बुरुड, रिक्षाचालकशहरातील रिक्षा चालकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. केवळ गॅस किट असलेल्या रिक्षांनाच नव्हे तर डिझेल व पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांनाही अग्निशमन यंत्र बसविणे अत्यंत गरजेचे आहे.- संतोष पवार, नागरिक