शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव विलगीकरण कक्षासाठी उघडणार वित्त आयोगाची तिजोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:28 IST

तासगाव : कोरोनाचा वाढता फैलाव आटोक्यात येत नसल्यामुळे राज्य शासनाने रेड झोन असलेल्या जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय ...

तासगाव : कोरोनाचा वाढता फैलाव आटोक्यात येत नसल्यामुळे राज्य शासनाने रेड झोन असलेल्या जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर विलगीकरण कक्ष उभा करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून २५ टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत खर्च करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यास सांगली जिल्ह्यात अपयश आले आहे. कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढण्याचे प्रामुख्याने कारण गृह विलगीकरण असल्‍याचे दिसून आले आहे. एखादा रुग्ण कोरोनाबाधित झाल्यानंतर सौम्य लक्षण असल्यास गृह विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्या घरातील इतर लोकही कोरोनाबाधित होत असल्यामुळे, सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशीच अवस्था राज्यातील अन्य काही जिल्ह्यात झाली आहे. अशा जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे.

रेड झोनमध्ये समावेश केलेल्या जिल्ह्यात गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे यापुढे कोरोना बाधित रुग्णांना गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक वर्गीकरणात उपचार घ्यावे लागणार आहेत.

गाव पातळीवर संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींना पेलावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून २५ टक्केपर्यंत निधी खर्च करण्यास मंजुरी दिली आहे.

यापूर्वी कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीत अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी, रुग्णवाहिका पुरविण्यासाठी, कोरोनाच्या कामात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करण्यासाठीची तरतूद ग्रामपंचायत निधीतून करण्यात आली होती.

त्याच पद्धतीने एखाद्या ग्रामपंचायतीने कोविड झालेल्या रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात तीस किंवा त्यापेक्षा जास्त खाटांच्या विलगीकरण कक्षाची मागणी केल्यास, अशा ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीच्या २५ टक्केच्या मर्यादेपर्यंत खर्च करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपसचिव प्रवीण जैन यांनी मंगळवारी दिले आहेत.