शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:20 IST

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा ...

सांगली : कोणत्याही चित्रपटाची निर्मिती ही मोठी प्रक्रिया आहे. उठलो आणि चित्रपट तयार केला, असे होत नाही. अनेक चित्रपटांचा विचार पाच-सात वर्षांपासून सुरू असतो, तर काही चित्रपटांचे विचार लगेचच प्रत्यक्षात अवतरतात. चित्रपट दिग्दर्शन हा कलाप्रकार खूप खर्चिक व आव्हानात्मक असल्याने अवतीभोवती काय चालले आहे, याचे भान आवश्यक आहे. त्यामुळेच समाजाचा आवाज म्हणून चित्रपट माध्यम महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी रविवारी सांगलीत केले.सांगली फिल्म सोसायटीच्यावतीने आयोजित पहिल्या अशियाई चित्रपट महोत्सवाचा समोराप रविवारी अहिरे यांच्या प्रकट मुलाखतीने झाला. यावेळी ‘चित्रपट निर्मिती, त्यातील आव्हाने’ यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ या अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ५० व्या चित्रपटाचा आस्वाद रसिकांनी त्यांच्यासमवेत घेतला.ते म्हणाले, पूर्वीपासून दिग्दर्शकच व्हायचे ठरविले होते. तरीही मनापासून कविता लिहिण्याची आवड होती. कवी असाल तर सर्व काही साध्य होते. थेट काळजातून आलेली गोष्ट कवितेतून मांडता येते. याच कवितेतील भावना पडद्यावर मांडण्यात यशस्वी झालो. उठलो आणि दिग्दर्शन केले, असे कधीही होत नाही. हा कलाप्रकारच खूप खर्चिक असल्याने सुरुवातीला सिनेमा समजून घेणे महत्त्वाचे होते. त्यातूनच सिनेमा कसा करू नये, हेही शिकलो आणि सिनेमा कसा करावा हे लक्षात आले.चित्रपट दिग्दर्शनातील अनुभवाबाबत ते म्हणाले, आयुष्यात कोणताही एकच अनुभव समृध्द करतो, असे कधीही होत नाही. ज्वलंत जीवनानुभव महत्त्वाचे ठरतात. चित्रपट हा एकमताने करायचा कलाप्रकार आहे. हे टीमवर्क असले तरी त्यात दिग्दर्शकाची भूमिका महत्त्वाची असायला हवी. अगदी स्पॉटबॉईजपासून प्रत्येकाचे दृष्टिकोन असतात; पण योग्य दृष्टिकोन फक्त दिग्दर्शकालाच माहीत असतात.सांगली फिल्म सोसायटीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.चित्रपट निर्मिती... आव्हानात्मक कामअहिरे म्हणाले, चित्रपट निर्मिती हा व्यावसायिक कलाप्रकार असल्याने त्यात करोडो रुपये गुंतविलेले असतात. त्यावर अनेक लोक अवलंबून असतात. त्यामुळे मार्केट काय आहे, अवतीभोवती काय चालले आहे, आपण कुठे आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे आणि ते चित्रपटातून कशाप्रकारे सांगता आहात, तेही योग्य पात्रांच्या निवडीतून, हेच आव्हानात्मक काम आहे.