शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पशुवैद्यकीय’च्या रिक्त जागा भरणार

By admin | Updated: September 5, 2016 00:12 IST

महादेव जानकर : वेजेगावात पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे भूमिपूजन

विटा : पशुुसंवर्धन व दुग्ध विकास हे पूर्वी कृषी खात्याला संलग्न असल्याने ८० टक्के निधी कृषी खातेच घेत होते. त्यामुळे पशुसंवर्धन खाते दुर्लक्षित राहिले. परंतु, मी मंत्री झाल्यानंतर फिफ्टी-फिफ्टी निधी केला. आता येत्या सहा महिन्यांत पशुसंवर्धन खात्यात सुधारणा करणार आहे. मत्स्य व्यवसायामुळे २२ हजार कोटींचा फायदा होतो आहे. त्यामुळे आता आपल्या लोकांनीही मत्स्य व्यवसायाकडे वळावे. शेतकऱ्यांच्या पशुसंवर्धनासाठी आरोग्य सुविधा मिळण्यासाठी राज्यातील पशुवैद्यकीय पदाच्या रिक्त जागा तातडीने भरणार असल्याचे आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले. वेजेगाव (ता. खानापूर) येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे भूमिपूजन रविवारी मंत्री जानकर यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील, पशुसंवर्धन सभापती संजीव सावंत, जिल्हा परिषद सदस्य किसन जानकर, सभापती वैशाली माळी, उपसभापती किसन सावंत, माजी उपसभापती सुहास बाबर उपस्थित होते. जानकर म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे मंत्री आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार आहे. जाती-जातीत तेढ निर्माण होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकरी उद्ध्वस्त व्हायचा नसेल, तर त्याने प्रशासकीय लढाई लढली पाहिजे. सध्या खोट्या प्रतिष्ठेत पाटीलकी वाया जाऊ लागली आहे. चांगल्या ठिकाणी येऊन लोकांनी चांगले काम केले पाहिजे. संजय लोखंडे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास सुशांत देवकर, डॉ. बालेखान शेख, अ‍ॅड. विनोद गोसावी, नगरसेवक दिलीप आमणे, रामभाऊ देवकर, विकास चव्हाण, दशरथ लोखंडे, अजित पाटील, सचिता सावंत, डॉ. विजय सावंत, दीपक माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)