शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

जिल्हा बॅँकेत ३0 हजार रुपे कार्ड दाखल

By admin | Updated: December 11, 2015 00:48 IST

२९ डिसेंबरला वितरण : सर्व चाचण्या झाल्या यशस्वी

सांगली : अन्य बँक ग्राहकांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममधून व्यवहार करण्याची चाचणीही यशस्वी झाल्याने, नव्या वर्षापासून जिल्हा बँकेच्या रुपे कार्डची योजना सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३0 हजार रुपे कार्डे बँकेत दाखल झाली आहेत. येत्या २९ डिसेंबर रोजी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते याचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती दिलीपतात्या पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दिलीपतात्या म्हणाले की, २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता बँकेच्या सभागृहात रुपे डेबिट कार्डच्या वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे आमच्या ग्राहकांसाठीही आता ‘रूपे कार्ड’ देण्याची योजना आखली आहे. एनपीसीआयने देशभरातील सर्वच मान्यताप्राप्त बॅँकांच्या एटीएम व्यवहाराचे दरवाजे सांगली जिल्हा बॅँकेसाठी खुले केले आहेत. ज्याप्रमाणे जिल्हा बँकेचे कार्ड अन्य बँकांच्या एटीएममध्ये चालते, तसेच अन्य बँकेच्या ग्राहकांनाही जिल्हा बँकेच्या एटीएमचा वापर करता येणार आहे. त्याचीही चाचणी घेण्यात आली. ही शेवटची चाचणीही यशस्वी झाल्याने आता रुपे कार्डचा प्रयोग खऱ्याअर्थाने सफल झाला आहे. एकूण ३० हजार रूपे कार्ड बँकेत दाखल झाली आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० हजार इन्स्टा कार्डचे वितरण केले जाणार आहे. ग्राहकाने खाते उघडल्यानंतर लगेचच त्याला हे इन्स्टा कार्ड दिले जाणार आहे. यावर खातेदाराच्या नावाचा उल्लेख नसला तरी, खातेदाराच्या विनंतीवरून त्याचा अर्ज जमा झाल्यानंतर कार्डावर त्याचे नाव व क्रमांक नोंदला जाणार आहे. यापूर्वीच्या बॅँकेच्या एटीएम धारकांनाही प्राधान्याने रूपे कार्ड देण्याचा विचार बॅँक करीत आहे. उर्वरित १0 हजार कार्डे बँक ग्राहकांकडून अर्ज भरून घेऊन दिली जातील. ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)ग्राहकांच्या अपेक्षांप्रमाणे निर्णयाची पूर्तताग्राहकांच्या अपेक्षा, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी केलेल्या संपर्क अभियानातून ग्राहकांच्या अपेक्षा समजू शकल्या. अनेक तालुक्यांमध्ये, गावांमध्ये अनेक ग्राहकांनी अन्य बँकांच्या एटीएममध्ये चालणारे रूपे डेबिट कार्ड सुरू करण्याची मागणीही केली होती. त्यानुसार बॅँकेने हे पाऊल टाकले आहे, असे पाटील यांनी सांगितले.