शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळमध्ये मारामारी; एकावर विळ्याने हल्ला

By admin | Updated: July 18, 2016 00:38 IST

गंभीर जखमी : सहाजणांविरुद्ध गुन्हा

सांगली : आईला शिवीगाळ केल्याचा जाब एकाने विचारल्याच्या कारणावरून कर्नाळ (ता. मिरज) येथे दोन गटांत मारामारी झाली. गणेश लक्ष्मण नरळे (वय ३२) या तरुणावर विळ्याने हल्ला करण्यात आला. शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तातोबा नरळे, बाळू हिप्परकर, सुनीता तातोबा नरळे, शांताबाई करांडे, लता शिंदे, मंगल बाळू नरळे (सर्व रा. कर्नाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तातोबा नरळे याने शनिवारी रात्री दारूच्या नशेत गणेश नरळे यांच्या आईस शिवीगाळ केली होती. हा प्रकार समजताच गणेशने तातोबाला जाब विचारला. यातून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. तक्रारीनुसार संशयितांनी बेकायदा जमाव जमवून गणेशला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बाळू हिप्परकर याने त्याच्यावर विळ्याने हल्ला केला. यामध्ये गणेश गंभीर जखमी होताच संशयितांनी तेथून पलायन केले. रात्री उशिरा गणेशला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी गणेशचा जबाब घेऊन संशयितांविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)