शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कवलापुरात दोन गटांत मारामारी

By admin | Updated: August 22, 2016 00:02 IST

नऊ जखमी : घरात घुसून महिलांना चोपले; गुन्हा दाखल केल्याने वाद

सांगली : विनयभंगाची तक्रार दाखल केल्याच्या कारणावरून गेल्या तीन महिन्यांपासून कवलापूर (ता. मिरज) येथील मोहिते गटात सुरू असलेला वाद रविवारी दुपारी उफाळून आला. जिल्हा परिषदेच्या शाळा क्र. २ जवळ या दोन्ही गटांत जोरदार मारामारी झाली. एकमेकांचा थरारक पाठलाग करून मारहाण करण्यात आली. महिलांना तर घरातून ओढून लाकडी बांबूने मारहाण केली. यामध्ये चार महिलांसह नऊजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद नव्हता. जखमींमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित विजय शेखर मोहिते (वय २२) व त्याच्या गटातील छाया मुरलीधर मोहिते (४५), मनोज दिनकर मोहिते (२१), आशा शेखर मोहिते (३८), चंद्रकांत शेखर मोहिते (२०), तर पीडित महिलेच्या गटातील विशाल शिवलिंग मोहिते (३५), नंदा दिनकर मोहिते (४०, सर्व रा. कवलापूर) व नातेवाईक म्हणून आलेल्या कांचन कोंडिबा तांदळे (४५, मिरज), रत्ना प्रकाश आवळे (५०, म्हैसाळ, ता. मिरज) यांचा समावेश आहे. जखमींवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाकडी बांबू व दगडाने मारहाण केल्याने यातील चौघांचा हात मोडला आहे. तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस कवलापुरात तसेच रुग्णालयात दाखल झाले होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील व माधवनगरचे माजी पोलिस पाटील बबन आवळे यांनी जखमींची भेट घेऊन माहिती घेतली. मार्च महिन्यात संशयित विजय मोहिते याने महिलेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी विजयविरुद्ध गुन्हा नोंद होता. त्याला अटकही झाली होती. तेव्हापासून त्यांच्या गटात वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी पीडित महिलेचा गट व संशयित विजय मोहिते गटातील लहान मुलांत किरकोळ भांडण झाले होते. त्याचे पर्यवसान मोठ्यांमध्ये मारामारीत झाले होते. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत आला होता; पण तिथे दोन्ही गटांनी ‘तक्रार देणार नाही; आम्ही आपापसात मिटवतो’, असे सांगितले. हा वाद मिटविण्यासाठी रविवारी सकाळी गावात बैठक ठेवली होती. मात्र, ही बैठक झाली नाही. त्यानंतर दुपारी तीन वाजता बैठक घेण्याचे ठरले. दोन्ही गट जमले. यावेळी वाद मिटविण्याऐवजी त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण केली. लाकडी बांबू व दगडाने एकमेकांना पाठलाग करून चोपले. महिलांना तर घरातून ओढून मारहाण केली. या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. महिला आरडाओरड करीत पळत होत्या. रस्त्यावरील नागरिकांचीही पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस दाखल झाले. त्यानंतर दोन्ही गटाने पांगापांग केली. तरीही पोलिसांनी धरपकड केली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविले. (प्रतिनिधी) ‘सिव्हिल’मध्येही मारामारी दोन्ही गटांतील जखमी व त्यांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. आकस्मिक दुर्घटना विभागात दोन्ही गटाने एकाचवेळी गर्दी केली. तिथेही ते एकमेकांकडे खुन्नस नजरेने पाहत होते. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा मारामारी सुरू झाली. रुग्णालयातील पोलिसांनी मध्यस्थी करून मारामारी सोडविली. त्यानंतर दोन्ही गटास स्वतंत्रपणे वेगवेगळ्या विभागात ठेवून उपचार सुरू केले. रात्री उशिरापर्यंत पोलिस जखमींचे जबाब घेण्याचे काम करीत होते; पण गुन्हा दाखल झालेला नव्हता.