शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

बंडाची भाषा करणाऱ्यांनी समोरासमोर येऊन लढावे

By admin | Updated: September 27, 2014 00:12 IST

मदन पाटील : राष्ट्रवादी, भाजपला आव्हान

सांगली : सांगली मतदारसंघात आमच्या घराण्याला संपविण्यासाठी आतापर्यंत एकास एक उमेदवार दिले गेले. त्यामुळेच यंदा वेगवेगळे लढण्याची भूमिका पोटतिडकीने मांडली होती. आता राष्ट्रवादीचे खायचे दात बाहेर आले आहेत. ज्यांनी घोषणा केली, त्यांनी तरी किमान निवडणुकीच्या मैदानात उतरावे. आत एक आणि बाहेर दुसरेच, असे न करता सरळ समोरासमोर येऊन लढा, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री मदन पाटील यांनी राष्ट्रवादी व भाजपला आज (शुक्रवारी) दिले. मदन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्यावेळी काँग्रेसने मला उमेदवारी दिली. तत्पूर्वी मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली, पण मागील निवडणुकीवेळी मिरजेत काही घटना घडल्या. त्याचा भावनिक प्रचार झाला. लोकांच्या भावनेला हात घालून काही शक्तींनी माझा पराभव केला. आमदारकीच्या काळात सव्वादोनशे कोटींची कामे केली होती. शेरीनाला, झोपडपट्टीमुक्त शहर, खोकीमुक्त शहर, वारणा पाणी योजना या कामांना यश आले होते. या मुद्द्यांकडे जनतेनेही दुर्लक्ष केले. निवडणुकीनंतर माझे काय चुकले? हेच कळले नाही. मी कधी भ्रष्टाचारात सहभागी नाही. माझ्या वडिलांपासून घराण्याचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. आता त्यांचे खायचे दात बाहेर आले आहेत. कोण रिंगणात उतरतो आणि कोण पळ काढतो, हेच बघायचे आहे. संभाजी पवार यांनीही जनता दल, भाजप आणि आता शिवसेना असे पक्षबदल केले आहेत. त्यांना कितपत यश मिळते, हे माहीत नाही.केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, मंगळावर यान सोडण्याची तयारी काँग्रेसने केली. यापूर्वीही काँग्रेसने अशा अनेक मोहिमा राबविल्या, पण मोदींइतके मार्केटिंग केले नव्हते. लोकसभेवेळी त्यांनी मार्केटिंग करून जनतेची दिशाभूल केली. गेल्या चार महिन्यात महागाई किती कमी झाली? केंद्राच्या अंदाजपत्रकातूनही जनतेच्या हाती काहीच पडलेले नाही. (वार्ताहर)...तर त्यांचीही प्रकरणे बाहेर काढूखोटेनाटे बोलून माझ्यावर टीका करू नका. काढायचीच झाली, तर आम्हीही त्यांची प्रकरणे बाहेर काढू. निवडणुका खेळीमेळीत झाल्या पाहिजेत. कोणाला निवडून द्यायचे, हे जनता ठरवत असते, असा टोलाही पाटील यांनी लगावला. मुन्ना कुरणे काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. त्यांनाही अर्ज भरण्याचा अधिकार आहे. अजून अर्ज मागे घेण्यास वेळ आहे, असे म्हणत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.