शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची पन्नास टक्के गळती

By admin | Updated: May 24, 2017 23:37 IST

पाण्याची पन्नास टक्के गळती

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेकडून कृष्णा नदीतून दररोज ७२ एमएलडी पाणी उचलले जाते, पण प्रत्यक्षात ४५ एमएलडी पाणीच नागरिकांपर्यंत पोहोचते. पाणीपुरवठ्यात ५० टक्के गळती असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत उघडकीस आली. या बैठकीत नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा पंचनामा केला. दरम्यान, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी, बारा वर्षापासून जमिनीखाली मुजलेले व्हॉल्व्ह तात्काळ मोकळे करण्याबरोबरच, ५६ आणि ७० एमएलडीच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांतील पाणीप्रश्नी मंगळवारी महासभेत वादळी चर्चा झाली होती. महापौर हारूण शिकलगार यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारी पालिकेच्या सभागृहात नगरसेवक, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संगीता हारगे, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार, गटनेते किशोर जामदार, स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, दिलीप पाटील, राजू गवळी, मृणाल पाटील, बाळासाहेब गोंधळी, संगीता खोत, माजी महापौर कांचन कांबळे उपस्थित होते. गटनेते किशोर जामदार यांनी, मुळात नदीतून पाणी किती उचलता, किती देता याचे उत्तर द्या, म्हणजे नेमके पाणी कुठे मुरते हे तरी कळेल, असे मत मांडले. यावर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली. कृष्णा नदीतून दररोज ७२ एमएलडी इतके पाणी उचलतो, यातील ३० टक्के पाणी बेड वॉश्ािंगसाठी वाया जाते. इतर गळतीही आहे. एकूण ५० टक्के पाणी गळती असल्याची कबुलीच त्यांनी दिली. जामदार यांनी, ५० टक्के पाणी वायाच जाते, मग नागरिकांना पाणी कसे मिळणार? असा सवाल केला. महापौर शिकलगार म्हणाले की, पूर्वी शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी ४६ व्हॉल्व्ह जोडले होते. हे सर्व व्हॉल्व्ह जमिनीत गाडले गेलेत, ते सर्व बंद आहेत. हे सर्व व्हॉल्व्ह ओपन करायला सांगून दोन महिने झाले, सहा व्हॉल्व्ह ओपन झाले, आता अधिकारी मॅनपॉवर नसल्याचे कारण सांगत आहेत. आपणही या महापालिकेचे देण लागतो. व्हॉल्व्ह बेपत्ता आहेत, त्यामुळे महापालिकेचे नुकसान होते, याचे भान हवे. हे सर्व व्हॉल्व्ह खुले करा.आयुक्त खेबूडकर म्हणाले, आपल्या वितरण व्यवस्थेतच दोष आहे. नदीत पाणी आहे, पण नागरिकांच्या घरात नाही, हे चित्र चांगले नाही. ४६ व्हॉल्व्ह बंद करून टाकले, बारा वर्षे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेच नाही. पाणी वाया जाते, नागरिकांना पाणीच मिळत नाही, ही जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. सर्व व्हॉल्व्ह शोधा, १५ जूनच्या आत ५६ एमएलडीचे काम पूर्ण झालेच पाहिजे, ७० एमएलडीचे काम ठेकेदार वेळेत पूर्ण करीत नसेल तर, दंडात्मक कारवाई सुरू करा, असे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी ५६ एमएलडीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई सुरू आहे. त्याच्या बिलातून १७ लाख रुपये वसूल केले आहेत. आता ७० एमएलडीचे काम करणाऱ्या ठेकेदारावरही दरदिवशी ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे, असे सांगितले. बैठकीत उपमहापौर घाडगे यांनी ५६ एमएलडीचा प्रकल्प पूर्ण झाला नसताना, उद्घाटन कसे घेतले? असा सवाल केला. यामध्ये पाणी वाढले का? तसे असेल तर कुपवाडचे किमान पाणी कमी तरी व्हायला नको होते, उलट कमी झाले आहे. यावर अधिकाऱ्यांनी अद्याप ५६ एमएलडीचे काम अपूर्ण असल्याची कबुली दिली.