शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

वाळवा-शिराळ्यामधील मातब्बर नेत्यांची फिल्डिंग

By admin | Updated: April 20, 2015 00:03 IST

जिल्हा बँक निवडणूक : जयंतरावांना दहा जागांची अपेक्षा

अशोक पाटील- इस्लामपूर -सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. बँकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी वाळवा, शिराळा तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. या बँकेवर वर्णी लागावी म्हणून आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांत रस्सीखेच सुरू आहे. वाळवा व शिराळ्यातील मतदारांची संख्या पाहता, जयंत पाटील यांना १० जागांची अपेक्षा आहे. परंतु त्यांच्या पदरात ६ जागा पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जिल्ह्यात एकूण २,२0७ मतदान आहे. पैकी वाळवा-शिराळ्यात ६९३ इतके मतदान आहे. याचाच अर्थ संपूर्ण जिल्हा एका बाजूला आणि वाळवा-शिराळा तालुका एका बाजूला, अशी स्थिती आहे. यामुळे जयंत पाटील यांच्या समर्थकांनी २१ पैकी १० जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु त्यांच्या पदरात वाळव्यासाठी ४ व शिराळ्यासाठी २ जागा निश्चित पडतील, अशी चर्चा आहे. या दोन्ही तालुक्यातून जवळ-जवळ ३० जणांनी आपले अर्ज दाखल केले असून, निवडणूक बिनविरोध झाल्यास यातील संचालक निश्चित करताना जयंतरावांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आहेत. आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपचे आमदार आहेत. परंतु त्यांची संस्थात्मक ताकद तोकडी आहे. जयंतरावांचे खास समर्थक दिलीपराव पाटील यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या अध्यक्षपदावर जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. सहकारी क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले व शिवाजीराव नाईक यांचे पूर्वाश्रमीचे कट्टर समर्थक डॉ. प्रताप पाटील हे आता जयंत पाटील यांच्या गटात असल्याने त्यांनाही संधी मिळेल. विलासराव शिंदे हेही इच्छुक असले तरी, ते सध्या तरी अपात्र यादीत असल्याने त्यांच्या गटातून कणेगावचे अ‍ॅड. विश्वासराव पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.शिराळा तालुक्यात मानसिंगराव नाईक यांच्या संस्था सक्षम आहेत. सभासद मतदानही त्यांच्या बाजूने चांगले आहे. त्यामुळे ते स्वत: जिल्हा बँकेसाठी इच्छुक आहेत. वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. त्याखालोखाल काँग्रेस आणि भाजपची आहे. या निवडणुकीत पक्षीय पातळीवर शिवाजीराव नाईक यांचा विचार झाल्यास, त्यांच्या पदरातही एखादी जागा जाण्याची शक्यता आहे.