शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

बांधकामे अधिकृतसाठी दलालांची ‘फिल्डिंग’

By admin | Updated: June 15, 2014 00:22 IST

विट्यात खळबळ : एक ते तीन लाखांपर्यंतची दलाली; आठजणांवर गुन्हे

दिलीप मोहिते ल्ल विटाविटा नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत आठ जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल करून पाठीवर विटेकर नागरिकांची कौतुकाची थाप घेत असतानाच आता अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी दलालांनी ‘फिल्डिंग’ लावल्याची चर्चा जोरात सुरू असल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या दलालांनी पोलिसांत गुन्हे दाखल झाल्यानंतर ‘जात्यात व काही सुपात’ असलेल्या अनधिकृत बांधकाम मालकांचा पाठलाग करून बांधकाम अधिकृत करण्यासाठी एक लाखापासून ते तीन लाखांपर्यंतची सुपारी घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त आहे.खानापूर तालुक्यातील सुवर्णनगरी म्हणून विटा शहराकडे पाहिले जाते. वाढत्या विटा शहरात सध्या भूखंडाचे दर जवळपास मुंबईतील नरिमन पॉर्इंटच्या बरोबरीत पोहोचले आहेत. त्यामुळे मालमत्ताधारक आपली एक इंचही जागा सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाने बांधकाम परवाना देताना साईट मार्जीन व गटारी, रस्ते यासाठी जागा सोडण्यासह अन्य अटी घालून बांधकाम परवाने दिले आहेत. परंतु, अनेक मालमत्ताधारकांनी इमारतींचे बांधकाम करताना यातील बऱ्याच अटींचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याचे उजेडात आले आहे.विटा नगरपरिषद प्रशासनाने नुकत्याच केलेल्या पाहणीत शहरात अनधिकृत बांधकामे केल्याचे निदर्शनास आले. त्यातील आठजणांवर अनधिकृत बांधकामे केल्याने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. हे आठजण सध्या जात्यात आहेत. परंतु, सुपात असलेल्यांची यादी मोठी आहे. पण पालीका प्रशासनाने या यादीला अद्यापही का हात लावला नाही? असा सवाल विटेकर नागरिकांतून विचारला जात आहे. या यादीतील अनेक मोहरे हे राजकीय संबंधित असल्याने त्यांना पालिका प्रशासनाने ‘क्लिन चीट’ दिली का? असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित होत आहे.मात्र, आता अनधिकृत बांधकामांबाबत पोलिसांत गुन्हे दाखल झालेल्या आठजणांपैकी उर्वरित अन्य बेकायदेशीर बांधकामधारकांचा आता दलालांनी पाठलाग सुरू केल्याचे वृत्त आहे. अनधिकृत बांधकाम यादीत असणाऱ्या लोकांशी संपर्क साधून तुमचे अनधिकृत बांधकाम अधिकृत करून देण्याची या दलालांनी सुपारी घेतल्याचे सांगितले जात असून, दलालांनी सावज पाहून या कामाचा दर १ लाखांपासून ते ३ लाखांपर्यंत निश्चित केल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, हे दलाल एवढी रक्कम घेऊन अनधिकृत बांधकाम अधिकृत कसे व कोणाकडे जाऊन करणार? हा प्रश्न आज तरी अनुत्तरीत आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून, पालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळींनी अशा दलालांचा शोध घेऊन तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विटेकर नागरिकांतून होत आहे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात सामाजिक संघटना आणि ठेकेदारांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.