शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचे सोमवारपासून उपोषण

By admin | Updated: December 13, 2014 00:15 IST

एलबीटीला विरोध : महापालिकेसमोर आंदोलन

सांगली : एलबीटीच्या (स्थानिक संस्था कर) वसुलीसाठी महापालिका आयुक्तांनी फौजदारीची कारवाई सुरु केली आहे, याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांच्यावतीने सोमवारपासून (१५ डिसेंबर) महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समीर शहा, विराज कोकणे, आप्पा कोरे, विरेन शहा आदींनी आज (शुक्रवार) येथे पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनाचे नेतृत्व व्यापारी असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष मोहनदास गुरुनानी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. एलबीटीच्या वसुलीसाठी आयुक्तांनी आता व्यापाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरु केली आहे. राज्य शासन यासंदर्भात विचार विनीमय करण्याची प्रक्रीया सुरु केली असताना ही कारवाई अशोभनीय आहे. आयुक्त इतके कायदेशीर वागणार असतील तर त्यांनी वसंदादा बँकेतील महापालिकेच्या ठेवींची वसुली करुन दाखवावी. याकडे दुर्लक्ष करुन ते काँग्रेसची पाठराखण करीत आहेत. एलबीटी वसुलीच्या निषेधार्थ महापालिकेतील सर्व व्यापारी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु करणार आहेत. यामध्ये राज्यातील सर्व प्रमुख शहरातील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यानंतरही कारवाई न थांबल्यास महापालिका क्षेत्रातील व्यापार बेमुदत बंद करण्यात येईल. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनदास गुरुनानी हे रविवारी सांगलीत येणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली रात्री आठ वाजता व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सतरा महापालिकांचे प्रतिनिधी येणारएलबीटी वसुलीच्या निषेधार्थ सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात येणार असून पहिल्या दिवशी एलबीटी लागू करण्यात आलेल्या राज्यातील १७ ड वर्ग महापालिकेतील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या दिवशी ‘फॅम’चे अध्यक्ष मोहन गुरुनानी उपस्थित राहणार आहेत.