शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

By admin | Updated: March 5, 2016 00:22 IST

चंद्रकांत पाटील : संख येथील बैठकीत चारा, पाणी टंचाईचा आढावा

संख : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे राहणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढावे लागले तरी चालेल, पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.संख (ता. जत) येथे ते आढावा बैठकीत बोलत होते. आढावा बैठकीमध्ये पाणी टंचाई, चारा टंचाई, म्हैसाळ योजनेचा आढावा घेतला. पाणी टंचाईचा आढावा तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी ओमराज गव्हाणे, उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी, तर म्हैसाळ योजनेचा आढावा कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी घेतला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पन्न समितीच्या आवारात गोदाम, कोल्ड स्टोअरेज बांधणार आहोत. तसेच मागेल त्याला टॅँकर दिले जाणार आहेत. म्हैसाळ योजनेसाठी निधी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी पूर्व भागातील ओढापात्रात सोडण्यासाठी २०० कोटी रुपयांची गरज आहे. ते पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून या ठिकाणी जनावरांना चारा छावणीची मागणी केली. तसेच जनावरांना छावणी सुरू करण्यासाठी चारा डेपो किंवा छावण्या सुरू केल्या जातील. खा. संजय पाटील यांनी, २०० कोटी रुपये म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी देऊन ८० गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. आ. विलासराव जगताप म्हणाले की, म्हैसाळ योजनेसाठी २०० कोटी निधी द्यावा, तालुका विभाजन करावे, तालुक्यासाठी पूर्व भागात एक अतिरिक्त तहसीलदार देण्याची मागणी केली आहे. यावेळी आ. सुरेश खाडे, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी अशोक पाटील, माजी सभापती आर. के. पाटील, राजेंद्र कन्नुरे, डॉ. रवींद्र आरळी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांच्या सूचना स्वीकारणारसध्या जो शेतकऱ्यांच्या सुविधांवर बोलतो तो नेता आणि जो शेतकऱ्यांच्या सवयीवर बोलतो तो शत्रू, असे मानण्याची पध्दत वाढली आहे. तुम्ही सूचना करा, त्या स्वीकारल्या जातील असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.