शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकची ऊसबंदी शेतकऱ्यांनी झुगारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:19 IST

सांगली : कर्नाटकची ऊसबंदी शेतकऱ्यांनी झुगारून लावण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले. ...

सांगली : कर्नाटकची ऊसबंदी शेतकऱ्यांनी झुगारून लावण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले. त्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ. जयसिंगपुरात शनिवारी (दि. २३) रोजी ऊस परिषदेत आंदोलनाची दिशा ठरविणार आहे.यावेळी रविकांत तुपकर, महेश खराडे, संदीप राजोबा उपस्थित होते.शेट्टी म्हणाले की, यंदा कमी उसामुळे गळीत हंगाम तीन महिनेदेखील चालण्याची शक्यता नाही. उत्पादनाअभावी चांगल्या दराची अपेक्षा आहे. सरकारने साखरेचे ३१ रुपयांचे पायाभूत मूल्य वाढवून ३५ रुपये करावे. कर्नाटकात ऊस उत्पादन २१ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सरकारने लादलेली झोनबंदी मान्य नाही. शेतीमाल देशात कोठेही विकण्याचा हक्क आहे. ‘एक देश एक कर’ असे धोरण असताना झोनबंदी म्हणजे दांभिकपणा आहे. त्याविरुद्ध कायदा हातात घेऊन कर्नाटकशी संघर्ष करावा लागेल. उसाची एफआरपी कृषिमूल्य आयोगाने यंदा वाढवली नाही. ती वाढविण्याची मागणी आहे. एकरी उत्पादन घटून खर्चही वाढल्याने ऊस धोरण नव्याने ठरवावे लागेल. यंदा साखर आयात झाली नाही, तर साखर उद्योगाला चांगले दिवस येतील. गेल्यावर्षी पाकिस्तानमधून कच्ची साखर आणून सरकाने चूक केली.शेट्टी म्हणाले की, एकरकमी एफआरपी शक्य नसल्याचा कारखानदारांचा सूर मान्य नाही. तो आमचा अधिकार असून, घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रसंगी सरकारने त्यासाठी कारखान्यांना मदत करावी, सॉफ्ट लोन द्यावे. गतवर्षीची एफआरपी न दिल्याने सात कारखान्यांना गाळप परवाना मिळालेला नाही. गाळप सुरू केले, तर साखर आयुक्त प्रतिटनाला पाचशे रुपये दंड ठोठावणार आहेत. बिले न देणाºया कारखान्यांना शेतकºयांनी ऊस घालू नये.महाशिवआघाडीचे निमंत्रण नाहीशेट्टी म्हणाले, सरकारमध्ये सामील होण्याचे महाशिवआघाडीचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. मिळाले तरी, त्यांच्या किमान समान कार्यक्रमात शेतकरी कितपत केंद्रस्थानी आहे हे पाहू. केंद्र व राज्यातील भाजपने शेतकºयांना फसवले आहे. त्यांना बाजूला ठेवून सरकार आणण्यासाठी काही गोष्टी नजरेआड कराव्या लागतील. अवकाळीमुळे पश्चिम महाराष्ट्रात महिन्याभरात ६७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. वाढीव भरपाईसाठी राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत.पीकविमा कंपन्यांचे लेखापरीक्षण करापीकविमा कंपन्यांनी गेल्या वर्षीबारा हजार कोटींचा नफा मिळवला. यंदा मात्र ते पळ काढताहेत. सरकारने त्यांच्या नफ्याचे लेखापरीक्षण करावे. पीकविम्यासाठी स्वत:ची कंपनी सुरु करावी.