शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कवठेएकंदच्या शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: June 19, 2015 00:19 IST

सांगलीतील घटना : कृष्णा नदीच्या पुलाला गळफास घेतला

सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील प्रमोद आप्पासाहेब खाडे (वय ४२) या शेतकऱ्याने सांगलीतील बायपास रस्त्यावरील कृष्णा नदीच्या पुलाखालील कठड्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. प्रमोद खाडे दुपारी घरातून बाहेर पडले होते. त्यांचा भाऊ जिल्हा परिषदेत अभियंता आहे. दुपारी सव्वाचार वाजता खाडे यांनी भावाला मोबाईलवर संपर्क साधून ‘तू आईला सांभाळ, मी आत्महत्या करीत आहे’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी पुन्हा मेहुण्याशी (पत्नीच्या भावास) मोबाईलवर संपर्क साधला. ‘मी आत्महत्या करीत आहे, तुझ्या बहिणीला सांभाळ’, असे सांगून मोबाईल बंद केला. खाडे यांच्या भावाने व मेहुण्याने त्यांना पुन्हा मोबाईलवर संपर्क साधला. परंतु, त्यांचा मोबाईल बंद होता. खाडे बायपास रस्त्यावरील कृष्णा नदी पुलावरील सिमेंटच्या संरक्षण कठड्याला बसवण्यात आलेल्या लोखंडी पाईपवर गेले. तेथे त्यांनी दोरीने गळफास घेऊन नदीच्या दिशेने खाली उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.पुलाखाली एकाचा मृतदेह गळफासाने लटकत (पान १० वर)नैराश्येतून कृत्य?खाडे यांच्या घरची परिस्थिती चांगली आहे. तीन ट्रॅक्टर आहेत. ते स्वत: शेती करीत होते. गेल्या आठ दिवसांपासून ते नाराज होते. यातून त्यांनी हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. या प्रकरणी नातेवाइकांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले.