शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: April 9, 2017 23:33 IST

मसूरमधील घटना; बाथरूममध्ये गळफास; बँका, सोसायटीसह फायनान्सचेही कर्ज

मसूर : येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दामोदर नथाराम बर्गे (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, मसूर येथे दामोदर बर्गे हे पत्नी, दोन मुले, सून, नातवंडांसह वास्तव्यास असून, या कुटुंबाला दोन एकर शेतजमीन आहे. दामोदर यांचा थोरला मुलगा मोलमजुरी करतो, तर लहान मुलाने वडाप व्यवसायासाठी फायनान्सवर कर्ज काढून रिक्षा खरेदी केली आहे. दामोदर यांची पत्नी शेतीकाम करत घर सांभाळते. दामोदर यांनी शेती व मुलांच्या रोजगारासाठी बँक, सोसायटी, फायनान्स कंपनी व इतर ठिकाणाहून पैसे घेतले होते. या कुटुंबावर विविध ठिकाणचे कर्ज असल्याने त्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू होता. शेतीतून उत्पन्न न निघाल्याने व कर्ज वसुलीचा तगादा असल्यामुळे दामोदर यांनी यापूर्वीच अर्धा एकर शेती विकली आहे. त्यानंतरही कर्जाच्या परतफेडीसाठी विविध ठिकाणांहून तगादा सुरू होता. सर्व कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याने घरात वादविवाद व मानसिक ताणतणाव होत होता. या कर्जबाजारीपणास कंटाळून दामोदर यांना मानसिक नैराश्य आले होते. या नैराश्यापोटी त्यांनी रविवारी पहाटे राहत्या घरी बाथरूममध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.सकाळी बाथरूमचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याने दामोदर यांची नात तिकडे गेली असता आजोबांचा मृतदेह लटकत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी याबाबत मसूर पोलिस दूरक्षेत्रात माहिती दिली. याबाबत मसूर पोलिस दूरक्षेत्रात नोंद झाली आहे. आत्महत्यांचं सत्र सुरूचकऱ्हाड शहरासह तालुक्यात गेल्या महिन्यापासून आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. एका दाम्पत्याने तीन मुलांना नदीपात्रात फेकून देऊन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वडगाव हवेलीतील दोन सख्ख्या भावांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी कऱ्हाडातील उद्योजकाने आत्महत्या केली तर त्याच दिवशी मलकापूर येथील तणावग्रस्त युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. या घटना ताज्या असतानाच रविवारी पहाटे मसूर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.