शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

‘टेंभू’साठी शेतकऱ्यांचा ठिय्या-: योजनेतून कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोल्याला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:39 IST

टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील आणि लाभक्षेत्राबाहेरील सर्व गावांना पाणी देण्याच्या मागणीसाठी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शेतकºयांनी सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन

ठळक मुद्देअधिकाºयांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

सांगली : टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील आणि लाभक्षेत्राबाहेरील सर्व गावांना पाणी देण्याच्या मागणीसाठी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शेतकºयांनी सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले होते. अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले यांनी, योजनेच्या विद्युत मोटारी बंद पडल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. दि. २५ फेब्रुवारीपासून सर्व पंप चालू करून कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील गावांना पाणी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, आनंदराव पाटील, भारत पाटील, मनोहर विभुते, बाळासाहेब यादव, वाय. एस. बाबर, संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनात आटपाडी तालुक्यातील आटपाडी, भिंगेवाडी, माडगुळे, सोलापूर - सांगोला तालुक्यातील चोपडी, बलवडी, सोमेवाडी, बुध्याळ, गौरवाडी, उधणवाडी, नाझरे, हातीद, पाचिगाव बु. येथील शेकडो शेतकरी सहभागी होते.आंदोलकांनी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता गुणाले यांना मागण्यांचे निवेदन दिले. टेंभू योजनेचे पाणी बंद असल्यामुळे शेतकºयांची पिके वाळू लागली आहेत.

आटपाडी, सांगोला तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन तातडीने टेंभू योजना सुरु करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. दुष्काळावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी टेंभू योजनेचे पाणी सोडले, तर शेतकºयांचे मोठे नुकसान टळणार आहे, अशी भूमिका मांडली.

डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता गुणाले यांची भेट घेऊन चर्चा केली. गुणाले यांनी, येत्या दहा दिवसात योजनेच्या सर्व पंप हाऊसच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत टेंभू योजना चालू करण्यात येणार आहे. लाभक्षेत्रातील शेतकºयांना शंभर टक्के पाणी मिळणार असून लाभक्षेत्राबाहेरील गावांना पाणी देण्याबाबत कालवा समितीच्या बैठकीत निर्णय होईल, असे आश्वासन दिले.यावर शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. वंचितसह सर्वच गावांना पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकºयांनी केली. डॉ. पाटणकर यांनी, आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील सर्वच गावांना पाणी मिळाले पाहिजे, अशी मागणी केली.कालवा समितीलाच आडवे करू : पाटणकरशासनाने टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शंभर टक्के शेतकºयांना देण्याचे मान्य केले आहे. कुणीही वंचित राहाणार नाही, असे ठोस आश्वासन दिले असतानाही, कालवा समितीच्या काही सदस्यांनी लाभक्षेत्रातील शेतकºयांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली आहे. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी कालवा समितीचे सदस्य आडवे पडले, तर त्यांना आडवे करुन दुष्काळग्रस्त शेतकºयांना पाणी मिळवून देण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. २५ फेब्रुवारीपर्यंत टेंभू योजनेचे पाणी आटपाडी, सांगोला तालुक्यास न मिळाल्यास, स्थगित केलेले ठिय्या आंदोलन पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही ते म्हणाले.सांगली पाटबंधारे कार्यालयासमोर टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील आणि लाभक्षेत्राबाहेरील सर्व गावांना पाणी देण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :water transportजलवाहतूक